'पत्नी ३ महिन्यांची गरोदर असतानाच घटस्फोटाची...', मोहित रैनाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 15:43 IST2023-10-12T15:42:00+5:302023-10-12T15:43:21+5:30

मोहित आपल्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतोच मात्र मध्यंतरी तो आपल्या वैयक्तिक कारणामुळेही प्रकाशझोतात आला होता.

actor Mohit Raina says rumors of divorce spread when my wife was 3 months pregnant | 'पत्नी ३ महिन्यांची गरोदर असतानाच घटस्फोटाची...', मोहित रैनाने केला खुलासा

'पत्नी ३ महिन्यांची गरोदर असतानाच घटस्फोटाची...', मोहित रैनाने केला खुलासा

'देवो के देव महादेव' मधून भगवान शंकराच्या भूमिकेतून अभिनेता मोहित रैनाने (Mohit Raina) प्रेक्षकांचं मन जिंकलं. मोहित रैनाचा तेव्हापासूनच एक वेगळा चाहतावर्ग बनला आहे. मोहित आपल्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतोच मात्र मध्यंतरी तो आपल्या वैयक्तिक कारणामुळेही प्रकाशझोतात आला होता. मोहित आपल्या पत्नीला घटस्फोट देत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यावर मोहितने नुकतंच स्पष्टीकरण दिलं आहे.

मोहित रैनाची पत्नी आदिती चंद्राने काही महिन्यांपूर्वीच मुलीला जन्म दिला. आधी घटस्फोटाच्या चर्चा आणि नंतर लेकीचा जन्म यामुळे चाहतेही संभ्रमात पडले होते. नक्की काय झालं होतं यावर स्पष्टीकरण देताना मोहित म्हणाला,' जेव्हा माझ्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु होत्या तेव्हा माझी पत्नी ३ महिन्यांची गरोदर होती. आमचं नशीब तेव्हा आम्ही फिरायला गेलो होतो आणि तिथे नेटवर्क नव्हतं. आम्ही हिमाचल प्रदेशमध्ये सुट्टी एन्जॉय करत होतो. मीच माझ्या बायकोला तिकडे घेऊन गेलो होतो. मला जेव्हा कळलं की अशा चर्चा होत आहेत तेव्हा मला काय करावं कळलं नाही.'

तो पुढे म्हणाला,'माझी पत्नी या इंडस्ट्रीतील नाही. तिला मी कसं समजावणार होतो. तिच्या पालकांना कसं समजावणार होतो. मला त्यांना सांगताच आलं नाही की हे कसं काय झालं. माझ्या बाबतीत पहिल्यांदाच अशी बातमी पसरली होती त्यामुळे हे कसं हँडल करायचं याची मला माहितीच नव्हती.'

यावर्षी २६ जूनला मोहित रैनाला मुलगी झाली. तेव्हा कुठे त्याच्या घटस्फोटाच्या चर्चा थांबल्या. मात्र या चर्चांचा त्याला बराच मानसिक त्रास झाला होता. मोहितची 'मुंबई डायरीज 2' सिरीज नुकतीच प्रदर्शित झाली. याशिवाय तो 'द फ्रीलान्सर' या हॉटस्टारवरील वेबसिरीजमध्येही दिसला.

Web Title: actor Mohit Raina says rumors of divorce spread when my wife was 3 months pregnant