"आमचं अजून लग्नच झालेलं नाही कारण...", विवेक दहियाचा धक्कादायक खुलासा; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:37 IST2025-05-30T15:36:27+5:302025-05-30T15:37:17+5:30

लग्नानंतर ९ वर्षांनी हे काय बोलला विवेक दहिया?

vivek dahiya reveals they still havent registered their marriage dont have marriage certificate | "आमचं अजून लग्नच झालेलं नाही कारण...", विवेक दहियाचा धक्कादायक खुलासा; म्हणाला...

"आमचं अजून लग्नच झालेलं नाही कारण...", विवेक दहियाचा धक्कादायक खुलासा; म्हणाला...

'ये है मोहोब्बते' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी दहिया (Divyanka Tripathi Dahiya) आणि पती विवेक दहिया (Vivek Dahiya)  अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या लग्नाला ९ वर्ष झाली आहेत. मात्र अजून दिव्यांकाने गुडन्यूज दिली नाही अशी नेहमीच चर्चा होत असते. अनेकदा दोघांना बेबी प्लॅनिंगविषयी प्रश्नही विचारला जातो. मात्र दरम्यान आता विवेक दहियाने एक वेगळाच खुलासा केला आहे. त्यांचं अजून लग्नच झालं नसल्याचं तो म्हणाला आहे.

विवेक दहिया नुकतंच त्याच्या सासरी दिव्यांकाच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता. याचा त्याने व्लॉग शेअर केला आहे. यामध्ये फॅमिली गेट टुगेदरवेळी तो म्हणाला की त्याने दिव्यांकासोबत अद्याप लग्नच केलं नाहीए. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. मात्र तेवढ्यात आपलं म्हणणं मांडताना तो म्हणाला की, "लग्न झालं नाही म्हणजे आम्ही अद्याप आमचं मॅरेज रजिस्ट्रेशन केलेलं नाही. मॅरेज सर्टिफिकेटसाठी आम्ही अप्लाय केलेलं नाही."

विवेकने लग्न रजिस्टर न केल्याचा खुलासा तर केला. मात्र आता ते नक्की कधी रजिस्ट्रेशन करणार हे त्याने सांगितलेलं नाही. ८ जुलै २०१६ रोजी विवेक आणि दिव्यांकाने लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा असते. बरेचदा दिव्यांकाला तिने अजून गुडन्यूज न दिल्यामुळे प्रश्न विचारले जातात. सध्या दोघंही छोट्या पडद्यापासून दूर आहेत. 

Web Title: vivek dahiya reveals they still havent registered their marriage dont have marriage certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.