Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 21:01 IST2025-05-02T20:59:08+5:302025-05-02T21:01:05+5:30
Shraddha Kapoor Puran Poli Adam Mosseri watch Video: श्रद्धाने त्यांना गोड पुरणपोळी आपुलकीने खायला दिली

Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
Shraddha Kapoor Puran Poli Adam Mosseri watch Video : Waves Summit 2025 ला कालपासून सुरूवात झाली. या शिखर परिषदेत चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर सहभागी होत आहेत. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्यानंतर, श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO अँडम मोसेरी यांच्याशी संवाद साधला. यादरम्यान, श्रद्धा कपूरने मोसेरी यांच्याशी GenZ पिढी कंटेंट कशा पद्धतीने वापरतात, याबद्दल चर्चा केली. तसेच, महाराष्ट्रीय पाहुणचाराचा गोडवा दाखवत अभिनेत्री श्रद्धा कपूरने अँडम मोसरी यांचे पुरणपोळी खायला देऊन स्वागत केले.
अँडम मोसरी यांनी घेतला पुरणपोळीचा आस्वाद
गप्पांचे सेशन सुरू होण्यापूर्वी अभिनेत्री श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसरी यांचे स्वागत केले. अभिनेत्रीने त्यांच्यासाठी घरी बनवलेली पुरणपोळी आणली. श्रद्धा म्हणाली, 'मला माहिती आहे की तुम्ही फॅन्सी ठिकाणी जेवता आणि भारतीय जेवणाची चव पाहिली आहे. पण मला तुम्हाला हा महाराष्ट्रीयन गोड पदार्थ खायला द्यायचा आहे. तुम्ही ही पुरणपोळी खाऊन पाहा. ही माझ्या घरी बनवलेली आहे." त्यानंतर अँडम मोसेरी यांनी पुरणपोळी खाल्ली आणि ते पुरणपोळीच्या गोडव्याच्या प्रेमात पडले. पाहा व्हिडीओ-
मोसेरी यांचे रणवीर-दीपिकासोबत जेवण
त्याआधी, बुधवारी संध्याकाळी अॅडम मोसेरी यांनी बॉलिवूडमधील पॉवर कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या जोडीसोबत डिनर केले. मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये रणवीर-दीपिकासोबत ते दिसले. मोसेरी यांनी इन्स्टाग्रामवर डिनर आउटिंगचा एक सेल्फी देखील शेअर केला. फोटोला कॅप्शन देताना मोसेरी यांनी लिहिले होते की, आज संध्याकाळी मुंबईत पॉवर कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांना भेटून आनंद झाला आणि उत्तम जेवणाचा आस्वादही घेतला.