Video : अंकिता लोखंडेनं केलं Pre-wedding शूट; फॅन्स म्हणाले, "जबरदस्त"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 12:20 IST2021-12-12T12:20:03+5:302021-12-12T12:20:30+5:30

Ankita Lokhande-Vicky Jain wedding: कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नानंतर आता अंकिता लोखंडेच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.

Video: Ankita Lokhande did a pre-wedding shoot; Fans say "awesome" | Video : अंकिता लोखंडेनं केलं Pre-wedding शूट; फॅन्स म्हणाले, "जबरदस्त"

Video : अंकिता लोखंडेनं केलं Pre-wedding शूट; फॅन्स म्हणाले, "जबरदस्त"

Ankita Lokhande-Vicky Jain wedding: नुकतंच कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vickey Kaushal) यांचा विवाहसोळला पार पडला. अनेक ठिकाणी या विवाह सोहळ्याची चर्चाही झाली. परंतु आता मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे हीच्या विवाहाची चर्चा सुरू झाली आहे. अंकिता आपला बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत (Vickey Jain) सोबत लग्नगाठ बांधणार आहे. सध्या त्यांनी केलेलं प्री वेडिंग शूट हे चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक चाहत्यांनीही त्यांच्या या प्री वेडिंग शूटला पसंती दर्शवली आहे. 

अंकिता लोखंडेनं अगदी बॉलिवूड स्टाईनं आपल्या लग्नाचं प्री वेडिंग शूट केलंय. यामध्ये जबरदस्त लोकेशन्सचीही निवड केल्याचं दिसून येतं. दरम्यान, हे शूट दुबईत केल्याचंही समजतंय. परंतु अंकितानं याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. अंकिता या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनीही कमेंट्स केल्या आहे. काहींनी लोकांनी तर हा व्हिडीओ अतिशय जबरदस्त असल्याचं म्हटलंय.


मेहेंदीही सजली
अंकिताच्या हातांवर विकीच्या नावाची मेहंदी सजली आहे. यावेळी अंकिताच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. अंकिताच्या हातावर मेहंदी काढणारी आर्टिस्ट दुसरी कुणी नसून वीणा नागदा या होत्या. वीणा नागदा यांनीच कतरिनाच्या हातावरही मेहंदी काढली होती. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने अंकिताच्या मेहंदी सेरेमनीचे काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. यात अंकिता मेहंदी आर्टिस्ट वीणा नागदासोबत पोझ देताना दिसतेय. अंकिता व विकी येत्या १४ डिसेंबरला लग्नबंधणार अडकणार आहेत. १३ तारखेला हळद आणि संगीत सेरेमनी आयोजित केली आहे. या लग्नात अंकिता व विकीचे काही जवळचे मित्र व कुटुंबीय सहभागी होणार आहेत.  

Web Title: Video: Ankita Lokhande did a pre-wedding shoot; Fans say "awesome"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.