तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:58 IST2025-06-13T12:57:44+5:302025-06-13T12:58:08+5:30

Sunjay Kapur Net Worth: करिश्मा कपूरचा एक्स पती संजय कपूरने त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबासाठी मागे बरीच संपत्ती सोडली आहे. त्याची एकूण संपत्ती अब्जावधींमध्ये असल्याचेही म्हटले जाते.

Three marriages, 4 children, how rich was Karisma Kapoor's ex-husband Sunjay Kapur?, this much wealth he left behind | तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती

तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती

Sunjay Kapur Death:बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर(Karishma Kapoor)चा एक्स पती संजय कपूर(Sunjay Kapur)चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ब्रिटनमध्ये पोलो खेळत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याने या जगाचा निरोप घेतला. संजय कपूर हा एक प्रसिद्ध उद्योगपती होता आणि त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्याच्या मृत्यूनंतर त्याने त्यांच्या कुटुंबासाठी मागे भरपूर संपत्ती सोडली आहे.

दिल्लीचा रहिवासी असलेला  संजय कपूरने बकिंगहॅम विद्यापीठातून बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन पदवीचे शिक्षण घेतले. तो अनेक कंपन्या चालवत होता, ज्यातून तो भरपूर पैसे कमवत होता. संजयकडे एक नाही तर अनेक आलिशान बंगले होते. त्याची एकूण संपत्ती अब्जावधींमध्ये असल्याचेही म्हटले जाते.

किती संपत्ती सोडली मागे?
संजय कपूरने त्याच्या मृत्यूनंतर पत्नी आणि मुलांसाठी अफाट संपत्ती सोडली आहे. त्याच्याकडे दिल्ली आणि मुंबई तसेच लंडनमध्ये अनेक प्रीमियम मालमत्ता होत्या. त्याला आलिशान गाड्यांचा शौक होता आणि त्याच्याकडे महागड्या गाड्यांचे कलेक्शन होते. याशिवाय त्याने रिअल इस्टेटमध्येही मोठी गुंतवणूक केली होती. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, संजय कपूरची एकूण संपत्ती १२० कोटी रुपये होती.

संजय कपूरचे वैयक्तिक जीवन
संजय कपूरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्याने पहिले लग्न फॅशन डिझायनर नंदिता महतानीशी केले. २००३ मध्ये संजयने करिश्मा कपूरशी लग्न केले होते, परंतु २०१६ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. करिश्माने संजयवर खूप गंभीर आरोप केले होते, ज्यात घरगुती हिंसाचाराचाही समावेश होता. करिश्मा आणि संजयला समायरा आणि कियान ही दोन मुले आहेत, जी घटस्फोटानंतर अभिनेत्रीसोबत राहतात. संजयपासून घटस्फोट घेतल्यानंतर करिश्माने पुन्हा लग्न केले नाही. २०१६ मध्ये करिश्मा कपूरपासून घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूरने तिसऱ्यांदा २०१७ मध्ये प्रिया सचदेवासोबत लग्न केले.
 

Web Title: Three marriages, 4 children, how rich was Karisma Kapoor's ex-husband Sunjay Kapur?, this much wealth he left behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.