सलमान खानच्या 'सिंकदर'मध्ये या अभिनेत्रीची एन्ट्री, पहिल्यांदाच एकत्र झळकणार रुपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 04:37 PM2024-04-22T16:37:19+5:302024-04-22T16:38:30+5:30

Salman Khan's Sikandar Movie : अलिकडेच बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या आगामी 'सिकंदर' या चित्रपटाबाबत घोषणा करण्यात आली. तेव्हापासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान आता नवीन माहिती समोर आली आहे. या चित्रपटात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.

This actress' entry in Salman Khan's 'Sikandar' will be seen together on the silver screen for the first time | सलमान खानच्या 'सिंकदर'मध्ये या अभिनेत्रीची एन्ट्री, पहिल्यांदाच एकत्र झळकणार रुपेरी पडद्यावर

सलमान खानच्या 'सिंकदर'मध्ये या अभिनेत्रीची एन्ट्री, पहिल्यांदाच एकत्र झळकणार रुपेरी पडद्यावर

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान(Salman Khan)च्या आगामी 'सिकंदर' (Sikandar Movie) या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. तेव्हापासून सुपरस्टार सलमान खानच्या या चित्रपटाची चर्चा आहे. निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाच्या स्टारकास्टची घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत सुपरस्टार सलमान खानच्या या चित्रपटातून बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) सलमान खानच्या 'सिकंदर'मध्ये दिसणार असल्याचे समजते आहे. या वृत्तानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ते दोघे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, कियारा अडवाणी सलमान खानच्या 'सिकंदर'मध्ये दिसणार आहे. Filmfare.com ने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कियारा अडवाणी निर्माता साजिद नाडियाडवालाच्या ऑफिसबाहेर दिसली होती. त्यावेळी अभिनेत्री साजिद नाडियाडवालाच्या घराबाहेर स्पॉट झाली होती. याच्या काही दिवसांपूर्वीच साजिदने  सुपरस्टार सलमान खानसोबतच्या त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासून कियारा अडवाणी सुपरस्टार सलमान खानसोबत 'सिकंदर'मध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या वृत्ताची अद्याप पुष्टी झालेली नाही. 

ए आर मुरुगादास करणार 'सिकंदर'चे दिग्दर्शन 
सुपरस्टार सलमान खानच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन तमिळ चित्रपट निर्माते ए आर मुरुगदास करणार आहेत. दिग्दर्शक ए आर मुरुगादास यांनी सुरिया स्टारर 'गजनी' चित्रपटाची निर्मिती केली होती. याशिवाय त्यांनी रजनीकांतचा 'दरबार' आणि 'थुपुक्की' हे ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. आता दिग्दर्शक एआर मुरुगदास सुपरस्टार सलमान खानसोबत एक चित्रपट करणार आहेत. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता आहे. साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. निर्माते हा चित्रपट पुढच्या वर्षी ईद २०२५ ला रिलीज करणार आहेत.

Web Title: This actress' entry in Salman Khan's 'Sikandar' will be seen together on the silver screen for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.