धनश्री वर्मासोबत घटस्फोट, आर जे महावशला केलं अनफॉलो; युजवेंद्र चहल आता 'ति'च्यासोबत दिसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 13:32 IST2026-01-25T13:31:59+5:302026-01-25T13:32:23+5:30
युजवेंद्र चहलच्या आयुष्यात कोणाची एन्ट्री?

धनश्री वर्मासोबत घटस्फोट, आर जे महावशला केलं अनफॉलो; युजवेंद्र चहल आता 'ति'च्यासोबत दिसला
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी चहलने प्रसिद्ध आर जे महवश (RJ Mahwash) हिला सोशल मीडियावर अनफॉलो केल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. या कृतीमुळे नेटकऱ्यांमध्ये विविध तर्क वितर्क लढवले जात असतानाच, आता चहलचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो 'बिग बॉस' फेम आणि प्रसिद्ध अँकर शेफाली बग्गासोबत दिसत असल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
युझवेंद्र चहल आणि शेफाली बग्गा एकत्र रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसत आहेत. नंतर चहल पापाराझींना पोज देत आहे. तर शेफाली हसत बाजूला उभी आहे. पापाराझींनी दोघांना एकत्र फोटो देण्याची विनंती केली मात्र शेफालीने बसून चहलसोबत येणं टाळलं. तर चहलनेही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. यावेळी चहल ब्लॅक शर्ट आणि ब्लू फेडेड जीन्समध्ये दिसत आहे. तर शेफालीने ब्लॅक रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातल आहे. या दोघांमधील ही भेट नेमकी कशासाठी होती, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, सोशल मीडियावर मात्र त्यांच्या मैत्रीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. नेटकरी व्हिडीओवर कमेंट्स करत असून तो वेगाने व्हायरल करत आहेत.
दुसरीकडे, युझवेंद्र चहलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. गेल्यावर्षीच त्याचा धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यानच तो आर जे महावशसोबत दिसून येत होता. महावशनेही चहलला खूप पाठिंबा दिला होता. मात्र आता अचानक दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. आता लगेच चहल शेफाली बग्गासोबत दिसल्याने पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. चहल सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरी सोशल मीडियावरील त्याच्या या हालचालींनी चाहत्यांचे पूर्ण लक्ष वेधून घेतले आहे.
शेफाली बग्गा ही याआधी न्यूज चॅनलमध्ये अँकर होती. यानंतर ती २०१९ साली बिग बॉस १३ मध्ये सहभागी झाली होती. सध्या ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि मॉडेल म्हणून सक्रीय आहे. तसंच ती स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट्सचे अँकरिंगही करते.