Anurag Dobhal : कोट्यधीश यूट्यूबरच्या हत्येचा कट? कुटुंब-पैसा हिरावलं; म्हणाला, "आता जगण्यासारखं उरलं नाही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 12:14 IST2026-03-03T12:09:33+5:302026-03-03T12:14:05+5:30

Anurag Dobhal : लोकप्रिय यूट्यूबर आणि 'बिग बॉस १७' फेम अनुराग डोभालच्या लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

youtuber Anurag Dobhal aka uk rider emotional claim death attack already planned mentally toutured | Anurag Dobhal : कोट्यधीश यूट्यूबरच्या हत्येचा कट? कुटुंब-पैसा हिरावलं; म्हणाला, "आता जगण्यासारखं उरलं नाही..."

Anurag Dobhal : कोट्यधीश यूट्यूबरच्या हत्येचा कट? कुटुंब-पैसा हिरावलं; म्हणाला, "आता जगण्यासारखं उरलं नाही..."

लोकप्रिय यूट्यूबर आणि 'बिग बॉस १७' फेम अनुराग डोभालच्या लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. आपल्या जीवाला धोका असून आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक दावा अनुरागने केला आहे. अनुरागची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून चाहते त्याच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.

अनुराग डोभालने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने "गेल्या वर्षापासून काही लोक माझा मानसिक छळ करत आहेत. त्यांनी माझ्याकडून सर्व काही हिरावून घेतलं आहे. कुटुंब, पैसा आणि माझी नाती सुद्धा" असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

"माझ्या स्वतःच्याच माणसांनी मला इतका त्रास दिला आहे की आता जगण्यासारखं काही उरलेलंच नाही. जितकं शक्य होतं तितकं मी स्वतःसाठी लढलो. पण आता ते लोक माझा पाठलाग करत आहेत, जेणेकरून माझ्या हत्येचा कट रचता येईल. जितकं सहन करायचं होतं ते सहन केलं, आता यापुढे मी सहन करू शकत नाही. मी जाईन नक्कीच, पण या सर्वांचे खरे चेहरे आणि सत्य जगासमोर आणूनच जाईन. आता सहन होत नाही" असं अनुरागने म्हटलं आहे. 

अनुराग डोभालच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चाहते त्याच्या सुरक्षिततेसाठी काळजीत पडले असून त्याला धीर धरण्याचा सल्ला देत आहेत. मात्र अनुरागने या पोस्टमध्ये कोणाचंही नाव घेतलेले नाही. अनुराग एक यूट्यूबर आणि 'मोटो व्लॉगर' आहे. 

सोशल मीडियावर तो 'The UK07 Rider' या नावाने प्रसिद्ध आहे आणि त्याची प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग आहे. अनुराग 'बिग बॉस १७' मध्ये झळकला होता. शोमध्ये त्याची मुनव्वर फारुकीसोबतची भांडणं चांगलीच गाजली होती, तर मन्नारा चोप्रासोबतची त्याची मैत्री चर्चेचा विषय ठरली होती. अनुरागने शोमध्ये सलमान खानलाही नाराज केलं होतं, ज्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

Web Title : यूट्यूबर अनुराग डोभाल ने जान को बताया खतरा, साजिश और उत्पीड़न का आरोप

Web Summary : 'बिग बॉस 17' फेम यूट्यूबर अनुराग डोभाल ने मानसिक उत्पीड़न और जान से मारने की धमकी का आरोप लगाया। उन्होंने दावा किया कि उनके परिवार, पैसे और रिश्तों को छीन लिया गया, और उन्हें मारने की साजिश हो रही है। डोभाल ने सच्चाई उजागर करने की कसम खाई।

Web Title : YouTuber Anurag Doval Claims Life Threat; Alleges Conspiracy and Harassment

Web Summary : YouTuber Anurag Doval, famed from 'Bigg Boss 17', alleges mental harassment and life threat. He claims his family, money, and relationships were stolen, stating he's being pursued to be killed. Doval vows to expose the truth.