स्वीटूसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'देवयानी' मालिकेत साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 19:09 IST2022-01-17T19:08:23+5:302022-01-17T19:09:10+5:30
Madhura godbole: सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अन्विताने तिच्या एका मैत्रिणीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तिच्यासोबत असलेली ही मुलगी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

स्वीटूसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? 'देवयानी' मालिकेत साकारलीये महत्त्वपूर्ण भूमिका
'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे अन्विता फलटणकर (anvita phaltankar). या मालिकेत अन्विताने स्वीटू ही भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या मालिकेमुळे अन्विता अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यातच अन्वितादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम प्रयत्न करत असते. अन्विता अनेकदा तिच्या कुटुंबासोबत किंवा मित्रमंडळींसोबतचे फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. सध्या तिचा असाच एक फोटो चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अन्विताने तिच्या एका मैत्रिणीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये तिच्यासोबत असलेली ही मुलगी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अन्विताने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अभिनेत्री मधुरा गोडबोले हिच्यासोबत दिसून येत आहे. मधुरा आणि अन्विताची फार जुनी मैत्री असून अनेकदा या दोघी एकमेकींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
दरम्यान, मधुराचा गेल्या काही काळात कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. मधुराने अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे.
यात 'देवयानी', 'रुंजी', 'गंध फुलांचा गेला सांगून' या तिच्या काही मालिका चांगल्याच गाजल्या आहेत. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक नृत्यांगनादेखील असल्याचं सांगण्यात येतं.