'येड लागलं प्रेमाचं' मालिकेची वर्षपूर्ती! कलाकारांनी 'असं' केलं सेलिब्रेशन, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:44 IST2025-05-27T16:41:54+5:302025-05-27T16:44:46+5:30
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका गतवर्षी २७ मे २०२४ पासून सुरु झाली होती.

'येड लागलं प्रेमाचं' मालिकेची वर्षपूर्ती! कलाकारांनी 'असं' केलं सेलिब्रेशन, फोटो आले समोर
Yed Lagla Premach Serial: स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' ही मालिका गतवर्षी २७ मे २०२४ पासून सुरु झाली होती. अभिनेत्री पूजा बिरारी, विशाल निकम, नीना कुलकर्णी आणि अतिशा नाईक अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अगदी अल्पावधीतच या मालिकेने लोकप्रियतेच शिखर गाठलं. राया-मंजिरीच्या जोडीने मालिका रसिकांना आपलंसं केलं आहे. अशातच बघता बघता या मालिकेला एक वर्ष पूर्ण झाला आहे. याचनिमित्ताने मालिकेतील शशिकलाच्या मोठ्या मुलीची म्हणजेच ऋतुजाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता नवनाळेने खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
'येड लागलं प्रेमाचं' मालिकेने यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण केलं आहे. याचनिमित्ताने मालिकेच्या संपू्र्ण टीमने जंगी सेलिब्रेशन देखील केलं. यासंदर्भात अभिनेत्रीने प्राजक्ता नवनाळेने सुंदर पोस्ट लिहून त्यांचे काही खास क्षण शेअर केले आहेत. "येड लागलं प्रेमाचं…, प्रेक्षकहो आपल्या मालिकेला १ वर्ष पूर्ण झालं. खरं तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे . तुम्ही आमच्यावर खूप प्रेम करत आहात आणि यापुढेही हे प्रेम कायम असंच राहील यात काही शंकाच नाहीये… प्रेक्षकहो तुमच्या प्रेमाचं येड तुम्ही आम्हाला लावल आहे, आणि म्हणूनच आम्ही इतक्या ताकदीने काम करतोय आणि यापुढेही करत राहीन… असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम पाठीशी राहूदेत…. Thank u so much…". अशी पोस्ट लिहून अभिनेत्रीने प्रेक्षकांचे देखील आभार मानले आहेत.
दरम्यान, प्राजक्ताने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स करत मालिकेतील कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.