तुला शिकवीन चांगलाच धडा: चारुहासच्या सुधारत असलेल्या तब्येतीमागचं रहस्य भुवनेश्वरीला समजणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 15:40 IST2023-12-24T15:40:23+5:302023-12-24T15:40:49+5:30
Tula shikvin changlach dhada:चारुहास सरांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी अक्षरा त्यांची मदत करत आहे.

तुला शिकवीन चांगलाच धडा: चारुहासच्या सुधारत असलेल्या तब्येतीमागचं रहस्य भुवनेश्वरीला समजणार?
छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे तुला शिकवीन चांगलाच धडा. आतापर्यंत प्रेक्षकांनी या मालिकेत अक्षराचा संयमी, शांत स्वभाव पाहिला. परंतु, पहिल्यांदाच तिच्या स्वभावाची दुसरी बाजू समोर येत आहे. चारुहास सरांना बरं करण्यासाठी अक्षराने एक प्रकारे बंड पुकारला आहे. भुवनेश्वरीपासून लपवून ती चारुहास सरांवर उपचार करत आहे. परंतु, लवकरच तिचं हे सत्य भुवनेश्वरीसमोर येणार असल्याचं दिसून येत आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये चारुहास सर पहिल्यांदाच कोणाच्याही आधाराशिवाय व्यवस्थितपणे जीना उतरुन खालती येतात. इतकंच नाही तर ते डायनिंग टेबलवर सगळ्यांसोबत जेवायलाही बसतात. यावेळी भुवनेश्वरी अक्षराला देवाजवळ काय मागितलं? असा प्रश्नही विचारते. त्यावर चारुहास सरांची तब्येत लवकर बरी व्हावी, असं उत्तर ती देते.
दरम्यान, अक्षराने दिलेलं उत्तर आणि त्याचवेळी चारुहास सरांचं व्यवस्थित स्वत:च्या पायावर चालत येणं हे पाहून भुवनेश्वरीला संशय येतो. त्यामुळे अक्षरामुळे चारुहास सरांची तब्येत सुधारतीये हे सत्य भुवनेश्वरीला समजेल का? तिला समजलं तर पुढे काय होईल? असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. मात्र, या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.