मौनी रॉय, पुलकित सम्राटही 'क्योंकी सांस भी कभी बहू थी २'मध्ये दिसणार? प्रेक्षकांना उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 18:33 IST2025-07-18T18:32:19+5:302025-07-18T18:33:23+5:30
स्मृती इरानी तुलसीच्या भूमिकेतून टीव्हीवर कमबॅक करत आहेत. यामुळे अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

मौनी रॉय, पुलकित सम्राटही 'क्योंकी सांस भी कभी बहू थी २'मध्ये दिसणार? प्रेक्षकांना उत्सुकता
एकता कपूरची गाजलेली मालिका 'क्योंकी सांस भी कभी बहू थी' (Kyun Ki Saas bhi kabhi bahu thi) इतक्या वर्षांनी पुन्हा परत येत आहे. मालिकेचा सीक्वेल लवकरच भेटीला येणार आहे. स्मृती इरानी तुलसीच्या भूमिकेतून टीव्हीवर कमबॅक करत आहेत. यामुळे अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. मालिकेत मौनी रॉय (Mouni Roy), पुलकित सम्राट (Pulkit Samrat) यांचीही भूमिका होती. आता हे दोघंही सीक्वेलमध्ये परतणार असल्याची चर्चा आहे.
पुलकित सम्राट मालिकेत छोटा पण महत्वपूर्ण कॅमिओ करणार असल्याची चर्चा टेलिव्हिजनविश्वात सुरु आहे. लक्ष्य विरानी या आपल्या भूमिकेतच तो दिसेल. तर अभिनेत्री मौनी रॉय कृष्णा तुलसीच्या भूमिकेमुळे ओळखली गेली होती. तुलसीने दत्तक घेतलेल्या मुलीच्या भूमिकेत ती होती. या भूमिकेने तिला लोकप्रिय केले होते. हे स्वत: मौनीनेच अनेकदा मान्य केलं आहे. आज मौनी बॉलिवूड इंडस्ट्री गाजवत आहे. तरी ती आपल्या या जुन्या शोच्या सीक्वेलमध्ये काम करणार आहे. पुलकित आणि मौनी यांची मालिकेत केमिस्ट्री होती. कृष्णा आणि लक्ष्यची जोडी खूप गाजली होती. दोघं मालिकेत बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड होते. तेव्हा ते टीव्हीवरील लोकप्रिय कपल बनले होते.
कृष्णा आणि लक्ष्यच्या रियुनियनसाठी चाहते खूप उत्साहित आहेत. त्यांचं कमबॅक शोसाठी सर्वात मोठं हायलाईट असू शकतं. आता सीक्वेलमध्ये त्यांचा सीक्वेन्स नक्की काय असणार की काही ट्विस्ट येणार हे मालिका पाहूनच कळेल. मालिकेचा सीक्वेल हा मर्यादित भागांचाच असल्याचं निर्माती एकता कपूरने स्पष्ट केलं आहे.