"आम्ही सुटलो, आता स्वतःला सांभाळ", मुग्धाची बहीण प्रथमेशला असं का म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 20:07 IST2024-01-02T20:06:53+5:302024-01-02T20:07:39+5:30
Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम मॉनिटर आणि मोदक म्हणजेच मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली.

"आम्ही सुटलो, आता स्वतःला सांभाळ", मुग्धाची बहीण प्रथमेशला असं का म्हणाली...
सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम मॉनिटर आणि मोदक म्हणजेच मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) यांनी लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली. मित्रपरिवार, नातेवाईक आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात चिपळूणमध्ये मुग्धा-प्रथमेशचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्न आणि रिती रिवाजाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान आता मुग्धाची बहीण मृदूल हिने कानपिळीचा फोटो शेअर करत प्रथमेशला सावध केले आहे.
मुग्धाच्या बहिणीने प्रथमेशचा कान पिळीदरम्यानचा फोटो शेअर करत लिहिले की, आम्ही सुटलो, आता तुझा टर्न आहे प्रथमेश. स्वतः ला सांभाळ. कान २ कारणांसाठी पिळलाय, १. यासाठी की तुला काय काय सहन करायचाय याचा अंदाज यावा. २. आमच्या बहिणीला आजिबात त्रास द्यायचा नाहीये, कळलं? या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत असून काही युजर्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..
एका युजरने लिहिले की, वाह कारण खूप छान आहेत तुमची. दुसऱ्या युजरने म्हटले की, प्रथमेश कान चांगलाच तयारा झाला असेल आता. आणखी एकाने प्रथमेशला बिचारा म्हटलंय.
असे जुळले दोघांचे सूर
'सा रे ग म प लिटिल चॅम्प' फेम मोदक आणि मॉनिटर म्हणजेच प्रथमेश आणि मुग्धाने काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्यांनी साखरपुडाही उरकला होता. हे कळताच त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. आता ही सुरेल जोडी कायमची लग्नबंधनात अडकली आहे. प्रथमेश आणि मुग्धाची भेट अगदी लहान वयातच सारेगमप शोमध्ये झाली. दोघांच्याही गाण्याचा जॉनर एक असल्याने नंतर त्यांनी एकत्र शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम केले. तेव्हाच दोघांचे सूर जुळले. मुग्धा-प्रथमेशने रेशीमगाठ बांधल्याने चाहतेही आनंदी आहेत.