रितेश बोलत असताना रुचिताने तोंड फिरवलं; भाऊ चांगलाच भडकला, म्हणाला- "तुम्हाला जागा नाही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 09:02 IST2026-02-14T08:45:36+5:302026-02-14T09:02:28+5:30

या आठवड्यात रुचिताने दीपाली सय्यदला उद्देशून थुंकण्याचा अभिनय केला. त्यामुळे सदस्य चांगलेच चिडलेले दिसले. याच मुद्द्याला धरुन रितेशने आज रुचिताची चांगलीच शाळा घेतली.

While Riteish deshmukh was talking Ruchita jamdar turned her face bigg boss marathi 6 promo | रितेश बोलत असताना रुचिताने तोंड फिरवलं; भाऊ चांगलाच भडकला, म्हणाला- "तुम्हाला जागा नाही..."

रितेश बोलत असताना रुचिताने तोंड फिरवलं; भाऊ चांगलाच भडकला, म्हणाला- "तुम्हाला जागा नाही..."

'बिग बॉस मराठी ६' मध्ये आज भाऊचा धक्का पार पडणार आहे. यात रितेश देशमुख या आठवड्याभरात घरातील सदस्यांनी जी चांगली - वाईट कामं केली त्यावर खडे बोल सुनावणार आहे. हा आठवडा रुचिताने गाजवला. परंतु या आठवड्यात रुचिताने दीपाली सय्यदला उद्देशून थुंकण्याचा अभिनय केला. त्यामुळे सदस्य चांगलेच चिडलेले दिसले. याच मुद्द्याला धरुन रितेशने आज रुचिताची चांगलीच शाळा घेतली.

कलर्स मराठीने सोशल मीडियावर भाऊचा धक्क्याचा प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोत रितेशने रुचिताला चांगलंच सुनावलं. तो म्हणतो, ''रुचिता दीपाली यांच्याकडे बघून तुम्ही काय केलंत आ थूsss थुंकलात!''. अशातच रुचिता रितेशला मध्येच तोडते. त्यावर रितेश चांगलाच भडकतो आणि म्हणतो, ''मी बोलतोय. तुम्ही जे वागलात ते महाराष्ट्राच्या कुठल्याच आईला आवडलं नसेल.''


रितेशचं बोलणं सुरु असतानाच रुचिता तोंड फिरवून वेगळेच हावभाव करतो. हे पाहून रितेशचा पारा चढतो. तो तिला म्हणतो, ''ओ ओ,  तुम्हाला जर असे हे एक्सप्रेशन्स करायचे असतील ना, तर आज भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही. अप अँड गो!'', आता पुढे काय होणार हे आजच्या भागात बघायला मिळेल. एकूणच रुचिताला रितेशभाऊ आज चांगलंच फैलावर घेणार आहे. याशिवाय नॉमिनेट असलेल्या सदस्यांपैकी या आठवड्यात कोण घराबाहेर जाईल, याचीही सर्वांना उत्सुकता आहे.

Web Title : रितेश ने 'बिग बॉस मराठी 6' में रुचीता को फटकारा

Web Summary : 'बिग बॉस मराठी 6' में रितेश देशमुख ने रुचीता को दीपाली सय्यद के प्रति असम्मानजनक व्यवहार के लिए फटकारा। उन्होंने रुचीता के कार्यों की आलोचना की और कहा कि यह महाराष्ट्र में किसी भी माँ को स्वीकार्य नहीं होगा, क्योंकि उसने उन्हें बीच में टोका था।

Web Title : Ritesh scolds Ruchita on 'Bigg Boss Marathi 6' for disrespect.

Web Summary : Ritesh Deshmukh reprimanded Ruchita on 'Bigg Boss Marathi 6' for her disrespectful behavior towards Deepali Sayyad. He criticized her actions, stating they were unacceptable to any mother in Maharashtra, after she interrupted him.