आई कुठे काय करते: मालिकेत होणार आशुतोषच्या पुतण्याची एन्ट्री; इशासोबत जुळणार का त्याचं नातं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 18:09 IST2022-08-21T18:08:00+5:302022-08-21T18:09:05+5:30
Aai kuthe kay karte: काही दिवसांपूर्वी या मालिकेत आशुतोषची एन्ट्री झाली होती. त्यानंतर आता त्याच्या पुतण्याची एन्ट्री होणार आहे.

फोटो सौजन्य: 𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗦𝗲𝗿𝗶𝗮𝗹𝘀 𝗧𝗥𝗣𝘀 instagram 𝗣𝗮𝗴𝗲
'आई कुठे काय करते" (aai kuthe kay karte) या मालिकेने लोकप्रियतेची एक ठराविक उंची गाठली आहे. त्यामुळे या मालिकेविषयी वा त्यातील कलाकारांविषयी नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. आतापर्यंत या मालिकेत अनेक कलाकारांची एन्ट्री झाली आहे. या प्रत्येक कलाकाराने त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यातच आता मालिकेत पुन्हा एका नव्या अभिनेत्याचं पदार्पण झालं आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये मालिकेत आता आणखी एका कलाकाराची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेत आशुतोषची एन्ट्री झाली होती. त्यानंतर आता त्याच्या पुतण्याची एन्ट्री होणार आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेत लवकरच आशुतोषचा पुतण्या अनिश याची एन्ट्री होणार आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी अनिश या मालिकेत आला असून पहिल्याच भेटीत तो इशाच्या प्रेमात पडणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या मालिकेत आता पुन्हा एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, या मालिकेत अनिश ही भूमिका अभिनेता सुमंत ठाकरे साकारणार आहे. त्यामुळे अनिशच्या येण्यामुळे देशमुख कुटुंबात आता कोणतं नवं वादळ येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.