धर्माच्या कारणामुळे तुमच्या नात्यात दुरावा आला का? एजाज खानसोबतच्या ब्रेक-अपवर पवित्रा पुनिया स्पष्टच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 17:34 IST2024-12-16T17:33:11+5:302024-12-16T17:34:22+5:30
एजज खान पवित्रा पुनियाहून ११ वर्षांनी मोठा होता. धर्मांतराच्या दबावामुळे पवित्राने ब्रेकअप केलं असा तिने पहिल्यांदाच खुलासा केला आहे.

धर्माच्या कारणामुळे तुमच्या नात्यात दुरावा आला का? एजाज खानसोबतच्या ब्रेक-अपवर पवित्रा पुनिया स्पष्टच बोलली
बिग बॉस १४ फेम अभिनेत्री पवित्रा पुनिया (Pavitra Punia) आणि अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) यांचं अफेअर खूप चर्चेत होतं. जितकी यांच्या अफेअरची चर्चा झाली तितकाच त्यांच्या ब्रेकअपचा सर्वांना धक्का बसला. यावर्षीच्या सुरुवातीलाच पवित्राने ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं. विचारांमध्ये मतभेद असल्याचं कारण तिने तेव्हा दिलं होतं. पण आता पवित्राने वेगळाच खुलासा केला आहे.
'टेली मसाला'ला दिलेल्या मुलाखतीत एजाजचं नाव न घेता पवित्रा पुनिया म्हणाली, "एक स्त्री नम्र असलेलीच चांगलं आहे यात शंका नाही. पण जर ती नुसतीच बसून राहीली तर तुम्ही तिची विचारपूस करणारच ना. ती तुमच्याशी नम्रपणे बोलत आहे ना? मी प्रत्येक महिलेला हेच सांगेन जर पुरुष तुमच्यावर सतत दबाव टाकत असेल तर तो आत्मकेंद्री आहे. शांत बसून राहू नका. आम्ही नात्यात खूप प्रयत्न केले पण एक वेळ आलीच जेव्हा सगळं संपलं. आमच्या रिलेशनशिपमध्ये खूप जास्त मर्दानगी आणि अति फेमिनिजमने मोठी भूमिका निभावली"
धर्माच्या कारणामुळे तुमच्या नात्यात दुरावा आला का? यावर पवित्रा म्हणाली, "नाही, आमचं कुटुंब याबाबतीत पाठिंबा देणारं होतं. त्यांना माहीत होतं की या इंडस्ट्रीत जात आणि धर्म पाहिला जात नाही. मीही आधीच एजाज ला सांगितलं होतं की मी धर्म बदलणार नाही. जर कोणी धर्माबाबतीत प्रामाणिक नसेल तर तो तुमच्यासोबत तरी कसा असेल".
एजाज खानचा याआधी अनिता हसनंदानीशीही ब्रेकअप झाला होता.ती एजाजसाठी करिअरही सोडत होती. मात्र त्यांचा काही कारणाने ब्रेकअप झाला. बिग बॉस १४ मुळे एजाज आणि पवित्रा रिलेशनशिपमध्ये आले. एजाज पवित्रापेक्षा ११ वर्षांनी मोठा आहे.