"मला जे अश्लील वाटलं ते...", सुदेश म्हशिलकर यांना प्राची पिसाटनं चांगलंच धारेवर धरलं, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 14:26 IST2025-05-31T14:25:25+5:302025-05-31T14:26:08+5:30

Prachi Pisat On Sudesh Mhashilkar: सध्या मराठी कलाविश्वात प्राची पिसाट प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. सुदेश म्हशिलकर यांनी प्राचीला फेसबुकवर मला तुझ्यासोबत फ्लर्ट करायचं आहे असा मेसेज केल्यानंतर अभिनेत्रीने त्यांना चांगलंच धारेवर धरलं.

prachi pisat again angry on sudesh mhshilkar actress wants apology on his messages | "मला जे अश्लील वाटलं ते...", सुदेश म्हशिलकर यांना प्राची पिसाटनं चांगलंच धारेवर धरलं, म्हणाली...

"मला जे अश्लील वाटलं ते...", सुदेश म्हशिलकर यांना प्राची पिसाटनं चांगलंच धारेवर धरलं, म्हणाली...

सध्या मराठी कलाविश्वात प्राची पिसाट (Prachi Pisat) प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. सुदेश म्हशिलकर (Sudesh Mhashilkar) यांनी प्राचीला फेसबुकवर मला तुझ्यासोबत फ्लर्ट करायचं आहे असा मेसेज केल्यानंतर अभिनेत्रीने त्यांना चांगलंच धारेवर धरलं. तिने त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह मेसेजचा स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर शेअर करत त्यांना प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर काहींनी प्राचीला सपोर्ट केला तर काहींनी म्हशिलकर यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर बरेच दिवस शांत बसलेले सुदेश म्हशिलकर यांनी त्यांची बाजू मांडणारी पोस्ट शेअर केली आणि भाईंदर पोलीस ठाण्यात अकाउंट हॅक झाल्याची लेखी तक्रार केली होती. त्यावर प्राचीने टीका केली आहे. त्यानंतर तिने त्यांच्या मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर करत त्यांनी मांडलेल्या त्यांच्या बाजूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

प्राची पिसाटने सुदेश म्हशिलकर यांनी फेसबुकवर केलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आणि त्यांनी सोशल मीडियावर मांडलेल्या बाजूवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहे. तिने लिहिले की, पहिला मुद्दा: मला जे अश्लील वाटलं ते मी टाकलं. तर अश्लील मेसेजबद्दल बोलूया आधी. कारण टॉपिक तिथून सुरू झाला. पहिला मेसेज आला. अपमान करण्याऐवजी मी स्माइली टाकून दुर्लक्ष केलं. (जे प्रत्येक मुलगी करते टॉपिक संपवायला) (७ एप्रिल). दुसऱ्यांदा मेसेज आले. मी ठामपणे दुर्लक्ष केले. (७ एप्रिल). तिसरा मेसेज आले. मी माझ्या पद्धतीने उत्तर दिले (२४ मे). 

प्राची पिसाटने या मेसेजसोबत शेवटी लिहिलं की, तुम्ही शांत का होतात यांचे उत्तर द्या, मेसेजवर स्पष्टीकरण द्या. तुम्ही माफी मागा. अशाप्रकारे पुन्हा एकदा प्राची पिसाटने संतापून सुदेश म्हशिलकर यांच्यावर निशाणा साधलाय. आता या मेसेजवर सुदेश म्हशिलकर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल. 

Web Title: prachi pisat again angry on sudesh mhshilkar actress wants apology on his messages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.