Video: "लवकर बाहेर आली ते बरं झालं, कारण..."; रुचितासमोरच राधा पाटील असं काय म्हणाली?

By देवेंद्र जाधव | Updated: March 8, 2026 15:55 IST2026-03-08T15:53:42+5:302026-03-08T15:55:26+5:30

'बिग बॉस मराठी ६'च्या घरात काल जे एविक्शन झालं त्यात कमी मतं मिळाल्याने रुचिताला घर सोडावं लागलं. घराबाहेर आल्यावर रुचिताने सगळ्यात आधी राधा पाटीलची भेट घेतली.

What did Radha Patil say about Ruchita jamdar being eliminated from bbm 6 | Video: "लवकर बाहेर आली ते बरं झालं, कारण..."; रुचितासमोरच राधा पाटील असं काय म्हणाली?

Video: "लवकर बाहेर आली ते बरं झालं, कारण..."; रुचितासमोरच राधा पाटील असं काय म्हणाली?

'बिग बॉस मराठी ६'च्या घरात काल जे एविक्शन झालं त्यात कमी मतं मिळाल्याने रुचिताला घर सोडावं लागलं. रुचिता घराबाहेर जाताना सर्वच सदस्य भावुक झाले होते. विशालला अश्रू अनावर झाले होते. परंतु रुचिताचा घराबाहेर जाण्याचा निर्णय सर्वांना स्वीकारावा लागला. घराबाहेर आल्यावर रुचिताने सगळ्यात आधी राधा पाटीलची भेट घेतली. राधा पाटीलही 'बिग बॉस मराठी ६' मध्ये सहभागी झाली होती परंतु तिचा प्रवास लवकर संपला. राधा घराबाहेर आल्यावर रुचिताला काय म्हणाली?

राधा-रुचिताची भेट, काय घडलं?

रुचिताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यात ती म्हणते, ''एलिमिनेट झालीये मी! सगळ्यात पहिले कोणत्या व्यक्तीला भेटलीये, बघायचंय? पहिल्या आठवड्याची जुगलबंदी अजून चालूच आहे. माझ्या लोकांना वापस भेटतेय मी यासाठी खूश आहे.'' राधा पाटील रुचिताच्या मागे नाचत असते. रुचिताला हसू आवरत नाही. नंतर राधा रुचिताला उद्देशून म्हणते, '' मी भरपूर खूश आहे पण दुःख वाटतंय. मी हिला टॉप ५ मध्ये बघत होते. पण लवकर आली ते बरं झालं कारण मला स्कीनची ट्रीटमेंट करायची होती. हिने मला पत्ता दिला तर मला लवकर ट्रीटमेंट करता येईल.'' 




राधाचं हे उत्तर ऐकून रुचिताही थक्क होते. ती हसूनच म्हणते, ''ह्याच्यासाठी मला लवकर बोलावलंय या बाईने.'', अशाप्रकारे रुचिता-राधाचा हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. रुचिता-राधाची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात चांगली मैत्री झाली होती. आता घराबाहेर आल्यावर दोघींना पुन्हा एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला. रुचिता आणि राधा लवकरच एका प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करतील, अशी चाहत्यांना आशा आहे.

Web Title : बिग बॉस मराठी 6 से बाहर हुईं रुचिता से मिलीं राधा, बताई वजह।

Web Summary : बिग बॉस मराठी 6 से बाहर होने के बाद रुचिता पहली बार राधा पाटिल से मिलीं। राधा ने मज़ाकिया अंदाज़ में कहा कि वह खुश हैं कि रुचिता जल्द ही बाहर आ गई हैं, ताकि वह उनसे स्किन ट्रीटमेंट की सलाह ले सकें।

Web Title : Radha meets evicted Ruchita from Bigg Boss Marathi 6, reveals reason.

Web Summary : Evicted from Bigg Boss Marathi 6, Ruchita first met Radha Patil. Radha playfully said she's happy Ruchita is out early, so she can get skin treatment advice from her.