लोकप्रिय टीव्ही अभिनेता दुसऱ्यांदा लग्नबंधनात? परदेशी पत्रकारसोबत गुपचुप उरकलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 16:14 IST2023-03-06T16:13:42+5:302023-03-06T16:14:53+5:30

'मधुबाला' फेम अभिनेता विवियनने गेल्या वर्षीच गुपचुप लग्न केलं आहे.

vivian dsena married again in an intimate ceremony with long time girlfriend | लोकप्रिय टीव्ही अभिनेता दुसऱ्यांदा लग्नबंधनात? परदेशी पत्रकारसोबत गुपचुप उरकलं लग्न

लोकप्रिय टीव्ही अभिनेता दुसऱ्यांदा लग्नबंधनात? परदेशी पत्रकारसोबत गुपचुप उरकलं लग्न

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता विवियन डिसेना (Vivian Dsena) याने गुपचुप दुसरं लग्न उरकलं आहे. त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. कोण आहे त्याची दुसरी पत्नी ? ती नेमकं काय करते ? दोघं कुठे भेटले ? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत 

'मधुबाला' फेम अभिनेता विवियनने गेल्या वर्षीच गुपचुप लग्न केलं आहे. तो बऱ्याच काळापासून नूरन अलीसोबत (Nooran Ali) रिलेशनशिपमध्ये होता. नूरन ही भारतीय नसून ग्रीसची आहे. तिथेच त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर दोघेही मुंबईत सोबत राहत आहेत. माध्यम रिपोर्टनुसार विवियनला गर्लफ्रेंडसोबत लिव्हइन मध्ये राहायचे नव्हते. अद्याप विवियनने लग्नाबाबात अधिकृत खुलासा केलेला नाही.

दोघांची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली. नूरनला विवियनची मुलाखत घेण्याची इच्छा होती. पण विवियनने अनेकदा मुलाखत टाळली. शेवटी एकदा तो हो म्हणाला आणि त्यांच्यात मैत्रीही झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.. विवियनला एका महिन्यातच हे कळून चुकलं होतं की त्याला नूरन आवडायला लागली आहे. त्याला तिच्यासोबत लग्नही करयाचं होतं. विवियनच्या पहिल्या घटस्फोटावेळी नूरनने त्याला आधार दिला होता. विवियनला नुरनचा प्रामाणिकपणा भावतो.

विवियनची ही दुसरी पत्नी आहे. नूरन अली एक पत्रकार आहे. तिला भारत देश खूप आवडतो. लग्नानंतर नूरनने भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच ती पती विवियनसोबत मुंबईत शिफ्ट झाली. 

विवियनने याआधी २०१३ मध्ये अभिनेत्री वाहबीज दोराबजीशी (Vahbbiz Dorabjee) लग्न केले होते. मात्र २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांची भेट 'प्यार की एक कहानी' या मालिकेच्या सेटवर झाली होती.

Web Title: vivian dsena married again in an intimate ceremony with long time girlfriend