विशाल पांडेची बहीणही भडकली, शेअर केली लांबलचक पोस्ट; अरमान मलिकला बाहेर काढण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 16:27 IST2024-07-08T16:26:58+5:302024-07-08T16:27:57+5:30
विशाल पांडेची बहीण नेहा पांडेने इन्स्टाग्रामवर एक स्टेटमेंट प्रसिद्ध केलं.

विशाल पांडेची बहीणही भडकली, शेअर केली लांबलचक पोस्ट; अरमान मलिकला बाहेर काढण्याची मागणी
'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये सध्या थप्पड कांड चांगलंच गाजतंय. विशाल पांडेने (Vishal Pandey) कृतिका चांगली दिसते अशी टिप्पणी करताच अरमान मलिक (Armaan Malik) भडकला आणि त्याने विशालच्या कानशिलात लगावली. यामुळे अरमान विरुद्ध विशालचे फॉलोअर्स आमने सामने आले आहेत. विशाल पांडेच्या आईवडिलांनी अरमानवर कडक कारवाईची मागणी केली. तर आता त्याच्या बहिणीची प्रतिक्रिया समोर आली आहे.
विशाल पांडेची बहीण नेहा पांडेने इन्स्टाग्रामवर एक स्टेटमेंट प्रसिद्ध केलं. अरमानवर राग काढत तिने बिग बॉसकडे त्याला घरातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. ती म्हणाली, "मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या भावाने काहीही चुकीचं केलेलं नाही. त्याने कोणालाही अपमानित केलेले नाही. ना ही तो काही चुकीचं बोलला. त्याच्या कमेंटमागे काहीच चुकीचा हेतू नव्हता. दुर्भाग्याने अरमानने त्याने केलेल्या प्रामाणिक स्तुतीला चुकीचं घेतलं."
ती पुढे म्हणाली, "एक कुटुंब म्हणून आम्ही सगळे विशालसोबत आहोत. आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे आणि त्याचं चरित्र आम्हाला चांगलं माहित आहे. प्रत्येक महिलेला त्याच्याभोवती सुरक्षित वाटतं आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आम्ही त्याच्यासोबत उभे आहोत. त्याचं मन साफ आहे. अरमान या शोमध्ये राहण्याच्या लायक नाही. त्याने माझ्या भावाची सार्वजनिकरित्या माफी मागायला हवी. आपण सगळे विशालला पाठिंबा देऊया. त्याच्यासोबत उभे राहुया."