अखेर विशाल निकमने अक्षयाशी बांधली लग्नगाठ, पण फोटोच पोस्ट केले नाहीत, अभिनेता म्हणाला..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:26 IST2026-02-11T12:24:55+5:302026-02-11T12:26:38+5:30
विशालने त्याच्या वाढदिवशी अक्षयासोबत लग्नगाठ बांधली आहे. एरवी सर्व सेलिब्रिटी लग्नाचे फोटो लगेचच पोस्ट करत असतात. परंतु विशालने मात्र अजून एकही फोटो पोस्ट केला नाही. अखेर विशालने याविषयी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

अखेर विशाल निकमने अक्षयाशी बांधली लग्नगाठ, पण फोटोच पोस्ट केले नाहीत, अभिनेता म्हणाला..
मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता विशाल निकमच्या लग्नाची सर्वांना खूप उत्सुकता होती. गर्लफ्रेंड असलेली अभिनेत्री अक्षय हिंदळकरसोबत विशाल लग्न करणार होता. विशालच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता होती. अखेर विशालने त्याच्या वाढदिवशी अक्षयासोबत लग्नगाठ बांधली आहे. एरवी सर्व सेलिब्रिटी लग्नाचे फोटो लगेचच पोस्ट करत असतात. परंतु विशालने मात्र अजून एकही फोटो पोस्ट केला नाही. अखेर विशालने याविषयी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.
विशालने पोस्ट करुन काय लिहिलं?
विशालने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट केली आहे. विशाल लिहितो, ''आज १० फेब्रुवारी २०२६, माझा वाढदिवस सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद प्रवास आणि कार्यक्रमामुळे reply / call घेता आले नाहीत, त्याबद्दल क्षमस्व... आजच्या या खास दिवशी महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने मी आणि माझी सखी अक्षयाने
सात जन्मांची गाठ बांधली... लग्न सुफळ संपूर्ण पार पडलं... फोटो उद्या अपडेट करेन... हर हर महादेव'', अशाप्रकारे विशाल निकमने फोटो पोस्ट करुन सर्वांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे.
अशाप्रकारे विशाल निकमने अक्षयाशी लग्न केलं आहे. विशाल आज (११ फेब्रुवारी) फोटो पोस्ट करेन अशी चाहत्यांना आशा आहे. विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांनी स्टार प्रवाहच्या ‘साता जल्माच्या गाठी’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. आता ही ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. अभिनेता विशाल निकमच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर'दख्खनचा राजा ज्योतिबा माझा' या मालिकेतून त्याला प्रसिद्धी मिळाली. सध्या 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. विशाल निकम बिग बॉस मराठी तिसऱ्या पर्वातही सहभागी झाला होता.