'छावा' सिनेमाचं दमदार प्रमोशन, 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत दिसणार विकी कौशल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 13:16 IST2025-02-08T13:16:11+5:302025-02-08T13:16:26+5:30

'छावा' सिनेमाच्या निमित्ताने 'घरोघरी मातीच्या चुली' सेटवर विक्की कौशलने लावली खास हजेरी

vicky kaushal chhaava movie actor to seen in gharoghari matichya chuli star pravah serial to promote serial | 'छावा' सिनेमाचं दमदार प्रमोशन, 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत दिसणार विकी कौशल

'छावा' सिनेमाचं दमदार प्रमोशन, 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत दिसणार विकी कौशल

विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा या सिनेमातून दाखविण्यात येणार आहे. 'छावा'मध्ये विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. 'छावा' सिनेमाच्या निमित्ताने विकी कौशल 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत दिसणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे. 

स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत सध्या श्री आणि सौ स्पर्धेची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार? याची उत्सुकता असतानाच जानकी-ऋषिकेशच्या भेटीला एक खास पाहुणा येणार आहे. हा खास पाहुणा म्हणजे सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता विक्की कौशल. सध्या मालिकेत श्री आणि सौ स्पर्धा अटीतटीची होतेय. जानकी आणि ऋषिकेश अतिशय जिद्दीने ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जानकी-ऋषिकेशला प्रोत्साहन देण्यासाठी विक्की त्यांना खास टिप्स देणार आहे. "खेळ असो नाहीतर लढाई...हिंमत कधी हरायची नाही. खेळ जर जिंकायचाच असेल तर गनिमी काव्याने सुद्धा जिंकता येतो. लढाई आपल्या माणसांच्या भरोशावर लढायची असते. आपल्या टीमला सोबत घेऊन लढायची असते. आणि जगात नवरा बायको पेक्षा भारी टीम दुसरी कुठलीच नसते. तेव्हा जिद्दीने लढा द्या", असा कानमंत्र देत विक्की  जानकी-ऋषिकेशला देतो. 


जानकी-ऋषिकेश म्हणजेच रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे विक्कीसोबतचा शूटिंगचा दिवस कायम स्मरणात ठेवतील. "सुरुवातीला विक्कीसोबत काम करण्याचं दडपण होतं. मात्र त्यांनी येताक्षणीच हे दडपण दूर केलं. खूप गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या. मराठी भाषेवर त्यांचं विशेष प्रेम आहे. मालिकेतला सीन मराठीमध्ये असल्यामुळे त्यांनी शूटिंग सुरु होण्यापूर्वी संपूर्ण टीमशी संवाद साधला. मालिकांचं शूट नेमकं कसं होतं, उच्चार कसे असायला हवे अश्या बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. आम्हा सर्वांसाठीच ही फॅन मोमेण्ट होती", अशी भावना रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांनी व्यक्त केली. विक्की कौशलसोबतचा हा खास भाग पाहायचा असेल तर नक्की पाहा घरोघरी मातीच्या चुली सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर आणि १४ फेब्रुवारीपासून 'छावा' आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.

Web Title: vicky kaushal chhaava movie actor to seen in gharoghari matichya chuli star pravah serial to promote serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.