'कबीर सिंग' नंतर हिंदी चित्रपट का केले नाही? वनिता म्हणाली, 'सतत मोलकरणीच्या...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 10:44 IST2023-04-06T10:43:09+5:302023-04-06T10:44:06+5:30

'कबीर सिंग' सिनेमातील वनिता आणि शाहीदचा एक सीन भलताच गाजला होता.

vanita kharat maharashtrachi hasyajatra fame actress revealed why she rejected hindi films after kabir singh | 'कबीर सिंग' नंतर हिंदी चित्रपट का केले नाही? वनिता म्हणाली, 'सतत मोलकरणीच्या...'

'कबीर सिंग' नंतर हिंदी चित्रपट का केले नाही? वनिता म्हणाली, 'सतत मोलकरणीच्या...'

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातील स्टार कलाकार वनिता खरात (Vanita Kharat) अफलातून अभिनेत्री आहे. ती स्टेजवर आली की प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट होते. वनिताने तर बॉलिवूडलाही आपली दखल घेण्यास भाग पाडलंय. शाहीद कपूरच्या (Shahid Kapoor) 'कबीर सिंग' (Kabir Singh) सिनेमात तिने मोलकरणीची भूमिका साकारली होती. यानंतर मात्र ती कोणत्याही हिंदी सिनेमात झळकली नाही. याचं नेमकं कारण काय यावर वनिताने स्पष्टीकरण दिलं आहे.

'कबीर सिंग' सिनेमातील वनिता आणि शाहीदचा एक सीन भलताच गाजला. यामध्ये तिने शाहीद कपूरच्या घरात काम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली होती. वनिता चुकून घरातील कप फोडते आणि शाहीद तिच्यावर भडकतो. शाहीदचा असा अवतार बघून वनिता तिथून धूम ठोकते तर शाहीद तिच्या मागे मागे पळतो. दोघांच्या या सीनने प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पाडलं. मात्र वनिता पुन्हा एकाही हिंदी सिनेमात झळकली नाही. याचं कारण वनिताने एका मुलाखतीत सांगितलं आहे. वनिता म्हणाली, 'कबीर सिंग नंतर मला हिंदीतून अनेक ऑफर्स येत होत्या. मात्र तुम्ही एका प्रकारची भूमिका साकारली की तुमच्यावर तोच ठपका लागतो. सतत मोलकरणीच्याच भूमिका येत असल्याने मी सर्व ऑफर्स नाकारल्या.'

वनिता नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.२ फेब्रुवारी रोजी वनिताने तिचा बॉयफ्रेन्ड सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली. हास्यजत्रेतील अनेक कलाकारांनी वनिताच्या लग्नात उपस्थिती लावली आणि चांगलीच धम्माल केली. वनिता खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आणि बिंधास्त आहे. तीन वर्षांपूर्वी तिने केले न्यूड फोटो शूट चांगलेच चर्चेत आले होते. सध्या वनिता हास्यजत्रेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 

Web Title: vanita kharat maharashtrachi hasyajatra fame actress revealed why she rejected hindi films after kabir singh