"माझ्या आयुष्यात.." वनिता खरातच्या वाढदिवसानिमित्त पती सुमित लोंढेने लिहिलेली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 14:38 IST2023-07-19T14:36:13+5:302023-07-19T14:38:31+5:30

वनिताचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त पती सुमित लोंढेने एका खास पोस्ट शेअर केली आहे.

Vanita kharat birthday husband sumit londhe special post for her | "माझ्या आयुष्यात.." वनिता खरातच्या वाढदिवसानिमित्त पती सुमित लोंढेने लिहिलेली खास पोस्ट

"माझ्या आयुष्यात.." वनिता खरातच्या वाढदिवसानिमित्त पती सुमित लोंढेने लिहिलेली खास पोस्ट

उत्तम अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत नाव कमावणारी गुणी अभिनेत्री वनिता खरात.  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या वनिताचा आज वाढदिवस आहे. अनेक विविधांगी भूमिका साकारुन वनिताने तिच्या अभिनयाची छाप पाडली. वनिताने अनेक मराठी चित्रपटांत काम केलं आहे. वनिताचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त पती  सुमित लोंढेने एका खास पोस्ट शेअर केली आहे.


काही महिन्यांपूर्वीच वनिताने सुमितसोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल देखील झाले होते. आज वनिताच्या वाढदिवसानिमित्त सुमितने पोस्ट शेअर करत पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

सुमीतची पोस्ट
''माझ्या आयुष्यात प्रकाश घेऊन येणाऱ्या व्यक्तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!! लव्ह यू वनी. तुझे पुढचा दिवस, वर्ष आणि आयुष्य उत्तम जावो... तुझी खूप आठवण येत आहे लवकरच परत ये''. असे कॅप्शन या फोटोंसोबत सुमीतने दिलं आहे.

सध्या वनिता महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमबरोबर अमेरिका दौऱ्यावर आहे. वनिताने २ फेब्रुवारीला सुमित लोंढेबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. एका मुलाखतीमध्ये सुमित-वनिता यांनी त्यांची हटके लव्ह स्टोरी सांगितली. लॉकडाऊनमध्ये चक्क लुडो खेळता खेळता या दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. वनिताचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. 


 

Web Title: Vanita kharat birthday husband sumit londhe special post for her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.