तोंडात गुटखा ठेवून उर्फी जावेदचा फॅन करू लागला असं काही, व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 18:51 IST2022-01-31T18:41:07+5:302022-01-31T18:51:41+5:30
Urfi Javed : सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात उर्फीजवळ एक व्यक्ती तोंडात गुटखा भरून येतो आणि असं काही करू लागतो की, उर्फी पोट धरून हसू लागते.

तोंडात गुटखा ठेवून उर्फी जावेदचा फॅन करू लागला असं काही, व्हिडीओ झाला व्हायरल
उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे आणि विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते. अनेकदा तिला कपड्यांवरून ट्रोलही केलं जातं. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात उर्फीजवळ एक व्यक्ती तोंडात गुटखा भरून येतो आणि असं काही करू लागतो की, उर्फी पोट धरून हसू लागते.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, उर्फीचा एक फॅन तिच्याजवळ येतो. त्याला तिच्यासोबत फोटो काढायचा असतो. या व्यक्तीचं तोंड गुटख्याने भरलेलं आहे. अशात तो तिच्यासोबत सेल्फी घेऊ लागतो. पण त्याच्या वागण्यामुळे उर्फी पोट धरून हसू लागते.
या व्हिडीओ बॅकग्राउंला लोक बोलत आहेत की, एकदा पुन्हा तोडांतील गुटखा थुंकून टाक. उर्फी आधी तर या व्यक्तीला जरा घाबरते. पण नंतर ती जोरजोरात हसू लागते. पण तिचा फॅन काह मागे हटत नाही आणि तिच्यासोबत जवळ येऊन सेल्फी घेऊ लागतो. पण नंतर त्याला तोंडात गुटखा असल्याने जरा वाईट वाटतं. इतकंच नाही तर तो उर्फीला माफीही मागतो.
नुकतेच उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या नव्या फोटोशूटचे फोटो फॅन्ससाठी शेअर केले आहेत. ज्यात ती ब्रालेटमध्ये दिसत आहे. त्यासोबतच तिने पॅंटची बटनही उघडली आहे. या लूकमध्ये ती फारच हॉट दिसत आहे. तिचे फॅन्स या फोटोंवर लाइक्सचा पाऊस पाडत आहे. तसेच कमेंट करून तिचं कौतुकही करत आहेत.