प्रेमात धोका मिळालेल्या उर्फी जावेदने लग्नावर सोडलं मौन, अरेंज मॅरेजबद्दल म्हणाली - "कोणीतरी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:26 IST2025-02-22T16:26:14+5:302025-02-22T16:26:45+5:30

Urfi Javed : अतरंगी फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Urfi Javed, who was threatened in love, broke her silence on marriage, said about arranged marriage - ''Someone...'' | प्रेमात धोका मिळालेल्या उर्फी जावेदने लग्नावर सोडलं मौन, अरेंज मॅरेजबद्दल म्हणाली - "कोणीतरी..."

प्रेमात धोका मिळालेल्या उर्फी जावेदने लग्नावर सोडलं मौन, अरेंज मॅरेजबद्दल म्हणाली - "कोणीतरी..."

अतरंगी फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद (Uorfi Javed) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तसेच ती तिच्या बेधडक वक्तव्यांमुळेही चर्चेत येत असते. आता नुकताच उर्फी जावेदचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या लग्नाबाबत मौन सोडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री असेही सांगत आहे की प्रेमात तिची फसवणूक झाली आहे आणि आता ती अरेंज मॅरेजसाठी पूर्णपणे तयार आहे. उर्फी देखील व्हिडिओमध्ये तिच्या एंगेजमेंटच्या बातमीवर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

नुकतेच उर्फी जावेदच्या एंगेजमेंटच्या चर्चांनी जोर पकडला होता. उर्फीची एंगेजमेंट झाल्याची अफवा पसरली होती. आता या बातम्यांवर प्रतिक्रिया देताना ती म्हणाली, 'ज्योतिषाने सांगितले आहे, कोणीतरी मला ओपल देईल, तेही एंगेजमेंटमध्ये, कोणीतरी मला अशी स्वस्त अंगठी देईल. नाही भाऊ, माझा रोका झाला नाही, माझी फसवणूक झाली आहे. एका मुलाखतीदरम्यान उर्फीने सांगितले की, तिच्या एका एक्स बॉयफ्रेंडने तिची फसवणूक केली होती. तिने सांगितले होते की, ब्रेकअप झाल्यानंतरही तिच्या एक्सने तिला मुव्ह ऑन होऊ दिले नाही आणि तो तिच्यासोबत अनेक मुलींना डेट करत होता. उर्फीने सांगितले की, तिच्या एक्स तिला चार वर्षांपासून फसवत होता.

उर्फी जावेदला करायचंय अरेंज मॅरेज
इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत उर्फी जावेदने सांगितले की, आता ती अरेंज मॅरेजसाठीही पूर्णपणे तयार आहे. ती म्हणाली, 'आता मी म्हणेन, प्लीज काही व्यवस्था करा मला प्रेम मिळत नाहीये, मला जमत नाहीये. मी म्हणते की फक्त माझ्या आई-वडिलांनाच नाही, तर तुम्हालाही कोण भेटत असेल तर माझं लग्न लावून द्या, मी ॲरेंज मॅरेजसाठी पूर्णपणे तयार आहे. आता हीच आशा उरली आहे. 

Web Title: Urfi Javed, who was threatened in love, broke her silence on marriage, said about arranged marriage - ''Someone...''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.