उर्फी जावेदने हटवले लिप फिलर्स, शेअर केला वेदनादायक व्हिडीओ, चेहरा पाहून चाहते हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 17:08 IST2025-07-21T17:07:48+5:302025-07-21T17:08:29+5:30

उर्फी जावेदने आपल्या चेहऱ्यावरचे लिप फिलर्स काढून टाकले आहेत.

Urfi Javed Gets Lip Filler Dissolved Video Viral | उर्फी जावेदने हटवले लिप फिलर्स, शेअर केला वेदनादायक व्हिडीओ, चेहरा पाहून चाहते हैराण

उर्फी जावेदने हटवले लिप फिलर्स, शेअर केला वेदनादायक व्हिडीओ, चेहरा पाहून चाहते हैराण

Urfi Javed Gets Lip Filler Dissolved: उर्फी जावेद (urfi javed) हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद तिच्या अतरंगी स्टाईलमुळे कायम सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. ती कोणत्याही वस्तूपासून बनवलेले कपडे परिधान करु शकते.  अशातच उर्फीचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत उर्फी ही कुठल्या हटके ड्रेसमध्ये नाहीये. यामध्ये उर्फीचे ओठ आणि चेहरा प्रचंड सुजलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते काळजीत पडलेत.

उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो खूपच वेदनादायक आहे.  या व्हिडीओमध्ये, डॉक्टर तिच्या ओठांमध्ये इंजेक्शन देताना दिसून येतेय. त्या इंजेक्शननंतर तिचे ओठ आणि चेहरा पुर्ण सुजलेला दिसला. उर्फीनं व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये खुलासा केला की, ही लिप फिलर हटवण्याची प्रकिया आहे. 

उर्फीनं कॅप्शनमध्ये लिहलं, "हे कुठलंही फिल्टर नाहीये. मी माझे फिलर्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला. कारण ते चुकीच्या ठिकाणी बसले होते. मी पुन्हा फिलर्स घेईन, पण यावेळी नैसर्गिक पद्धतीने. मी असं अजिबात म्हणत नाही की फिलर्स वाईट आहेत. पण, फिलर्स काढून टाकणं खूप वेदनादायक असतं, फिलरसाठी तुम्ही चांगल्या डॉक्टरकडे जाणे खूप महत्वाचे आहे", असं तिनं म्हटलं. उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सौंदर्य उपचारांची ही वेदनादायक बाजू दाखवल्याबद्दल अनेकांनी तिचं कौतुक केलंय.


Web Title: Urfi Javed Gets Lip Filler Dissolved Video Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.