माझी तुझी रेशीमगाठ: नेहा आणि यश पहिल्यांदाच साजरा करणार व्हॅलेंटाइन डे; पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 16:23 IST2022-02-14T16:22:20+5:302022-02-14T16:23:03+5:30
Mazi tuzi reshimgath: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये यश आणि नेहा एका पार्कमध्ये भेटल्याचं पाहायला मिळत आहे.

माझी तुझी रेशीमगाठ: नेहा आणि यश पहिल्यांदाच साजरा करणार व्हॅलेंटाइन डे; पाहा Video
छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. सध्या या मालिकेत नेहा आणि यश यांच्या नात्यात अनेक मजेशीर वळणं येत आहेत. इतके दिवस यशचं प्रेम नाकारणारी नेहा आता त्याच्याच प्रेमात पडली आहे. त्यामुळे त्याच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहा शक्य होईल त्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. त्यातच नेहा आणि यश पहिल्यांदाच सगळे राग-रुसवे विसरुन भेटणार आहेत. इतकंच नाही तर ते चक्क व्हॅलेंटाइन डे सुद्धा साजरा करणार आहेत.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये यश आणि नेहा एका पार्कमध्ये भेटल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर काही ज्येष्ठ नागरिक त्यांना नवरा-बायको समजतात आणि व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छादेखील देतात. यावेळी नेहा माझी बायको असल्याचं यश या व्यक्तींना सांगतो. त्यामुळे हा प्रोमो चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, सध्या या मालिकेत नेहा आणि यश यांच्या लग्नासंदर्भात अनेक घटना घडत आहेत. एकीकडे नेहा आणि यशचं लग्न व्हावं अशी आजोबांचीही इच्छा आहे. परंतु, नेहा एका मुलीची आई आहे हे सत्य अद्याप त्यांना माहित नाही. तर, दुसरीकडे आजोबांचा बदला घेण्यासाठी सिम्मीही यशचं नेहासोबत लग्न लावण्यासाठी प्रयत्न करत आहे.