शेणाने जमीन सारवतांना अभिनेत्रीची झाली अशी अवस्था; Video पाहून हसू होईल अनावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 19:32 IST2022-04-27T19:31:00+5:302022-04-27T19:32:07+5:30
Man zal bajind: सध्या सोशल माडियावर 'मन झालं बाजिंद' या मालिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेतील बिहाइंड द सीन दाखवण्यात आला आहे.

शेणाने जमीन सारवतांना अभिनेत्रीची झाली अशी अवस्था; Video पाहून हसू होईल अनावर
कलाविश्वात वावरणाऱ्या कलाकारांविषयी प्रेक्षकांना कायमच हेवा वाटत असतो. त्यांची लक्झरी लाइफस्टाइल, फॅशन स्टेटमेंट जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. परंतु, हे यश, संपत्ती, प्रसिद्धी मिळवण्यामागे कलाकाराने दररोज प्रचंड मेहनत करावी लागते. सध्या मन झालं बाजिंद या मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात कलाकारांना त्यांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी काय काय करावं लागतं हे यात दाखवण्यात आलं आहे.
सध्या सोशल माडियावर 'मन झालं बाजिंद' या मालिकेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेतील बिहाइंड द सीन दाखवण्यात आला आहे. या मालिकेत अंतरा आणि गुली मावशी यांना शेणाने अंगण सारवायला सांगितलं आहे. मात्र, शेणात हात घालून सारवणं अंतराला शक्य होत नसल्यामुळे तिची रिअॅक्शन पाहण्याजोगी आहे. परंतु, हा सीन ती आनंदाने एन्जॉय करत असल्याचंही यात दिसून येत आहे.
सध्या मन झालं बाजिंद ही मालिका लोकप्रियतेच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. सुरुवातीच्या काळात ही मालिका फ्लॉप होणार असं अनेकांनी म्हटलं होतं. परंतु, ही मालिका आज लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते.