'जीव माझा गुंतला' अंतराचा बदलणार लूक; पहिल्यांदाच दिसणार बोल्ड अंदाजात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 16:13 IST2022-02-21T16:12:27+5:302022-02-21T16:13:27+5:30
Jeev Mazha Guntala: ही मालिका सुरु झाल्यापासून अंतरा साध्या वेशात प्रेक्षकांसमोर आली आहे. मात्र, आता तिच्या लूकमध्ये बदल होणार आहे.

'जीव माझा गुंतला' अंतराचा बदलणार लूक; पहिल्यांदाच दिसणार बोल्ड अंदाजात
छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे 'जीव माझा गुंतला'. ही मालिका पहिल्या भागापासून लोकप्रिय होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अंतरा आणि मल्हार यांच्यातील वाद, मग मैत्री या सगळ्या गोष्टींमुळे ही मालिका दिवसेंदिवस रंजक होत चालली आहे. यामध्येच आता मालिकेत एक नवं वळण येणार असल्याचं दिसून येत आहे. लवकरच अंतराचा लूक चेंज होणार आहे.
ही मालिका सुरु झाल्यापासून अंतरा साध्या वेशात प्रेक्षकांसमोर आली आहे. मात्र, आता तिच्या लूकमध्ये बदल होणार आहे. साध्या वेशातील अंतरा आता चक्क वेस्टर्न ड्रेसमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे.
खानविलकरांच्या घरी लवकरच काही खास पाहुणे येणार आहेत. त्यामुळे या निमित्ताने मल्हारने अंतराला एक टास्क दिला आहे. जर हा टास्क तिला जमला नाही तर तिला तिच्या आईच्या घरी जावं लागेल असंही तो म्हणाला आहे. त्यामुळे आता अंतरा पदर खोचून तयारीला लागली आहे.
दरम्यान,मल्हारने दिलेला टास्क पूर्ण करण्यासाठी अंतरा शिकतं. त्यामुळे तिचं इंग्लिश ऐकून मल्हार थक्क होतो. तसंच दुसरीकडे ती वेस्टर्स लूकमध्ये त्याच्या समोर येणार आहे. त्यामुळे आता अंतराचा हा बदलेला लूक पाहून मल्हारची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.