Video: 'मला तुझी गरज नाही'; गौरी आणि यश लवकरच होणार विभक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 19:03 IST2022-05-03T19:02:09+5:302022-05-03T19:03:52+5:30
Aai kuthe kay karte: एकीकडे अरुंधती तिच्या आयुष्यात स्थिरावत असतानाच तिच्या मुलांच्या आयुष्यात नवनवीन वादळ येत आहे.

Video: 'मला तुझी गरज नाही'; गौरी आणि यश लवकरच होणार विभक्त
'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेने सुरुवातीपासूनच लोकप्रियतेची एक उंची गाठली आहे. त्यामुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसते. यात अरुंधतीच्या आयुष्यात अनेक चढउतार आल्यानंतर आता कुठे ती स्थिरावत आहे. मात्र, अरुंधती स्थिरावत असतानाच तिच्या मुलांच्या आयुष्यात नवनवीन वादळ येत असल्याचं दिसून येत आहे. यात यश आणि गौरी यांच्या नात्यात दुरावा येणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये यश, अरुंधतीला गौरी आणि त्याच्यात झालेल्या वादाविषयी सांगतो. इतंकच नाही तर हे नातं आता केवळ नावापुरतं राहिलं आहे असंही सांगतो. यशचं ऐकल्यानंतर अरुंधती त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. मात्र, यशने त्या दोघांमध्ये नेमकं कशावरुन भांडण झालं हे सांगतो.
गौरी अमेरिकेला रवाना होणार असल्यामुळे ती यशला भेटते आणि त्याच्यासोबत काही काळ घालवण्याचा प्रयत्न करते. मात्र, या भेटीमध्ये तो सतत संजनाची तक्रार तिच्यापुढे करतो, जे ऐकून गौरी चिडते आणि त्याच्याशी वाद घालते. या दोघांचा वाद इतका विकोपाला जातो की, ''मला तुझी गरज नाही, तू सोडून गेलीस तरी चालेल'', असं यश गौरीला म्हणतो. त्यामुळे गौरी दुखावते.
दरम्यान, यशचं असं तडकाफडकी वागणं ऐकून दुखावलेली गौरी त्याच्यासोबत बोलणं कमी करते. त्यामुळे आता गौरी मनाने आपल्यापासून दूर गेली आहे असं यश, अरुंधतीला सांगतो. म्हणूनच, आता या मालिकेत अरुंधतीनंतर तिच्या मुलांच्या आयुष्यात आलेलं वादळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.