टीव्ही अभिनेत्री श्रेनू पारेखचं ठरलं! मराठी अभिनेत्यासोबत लग्नबंधनात अडकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 01:33 PM2023-11-06T13:33:53+5:302023-11-06T13:35:02+5:30

सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत त्यांनी ही गुडन्यूज दिली आहे.

TV actress Shrenu Parekh is going to get married to marathi actor Akshay Mhatre | टीव्ही अभिनेत्री श्रेनू पारेखचं ठरलं! मराठी अभिनेत्यासोबत लग्नबंधनात अडकणार

टीव्ही अभिनेत्री श्रेनू पारेखचं ठरलं! मराठी अभिनेत्यासोबत लग्नबंधनात अडकणार

अभिनेत्री श्रेनु पारेख (Shrenu Parekh) टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'इश्कबाज', 'इस प्यार को क्या नाम दूँ' सारख्या मालिकेत तिने काम केले आहे. श्रेनु लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याने चाहते खुश झालेत. लाँग टाईम बॉयफ्रेंड अक्षय म्हात्रेसोबत (Akshay Mhatre) ती सातफेरे घेणार आहे. सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत त्यांनी ही गुडन्यूज दिली आहे.

श्रेनु पारेखचा बॉयफ्रेंड अक्षय म्हात्रेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. यामध्ये त्याने श्रेनुचा हात हातात घेतला आहे. तसंच दोघांच्या हातात धागा बांधला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने लिहिले,'गाणं जुनं आहे पण भावना ताज्या आहेत.' तसंच पुढे #45daystogo असंही लिहिलं आहे. या पोस्टवर श्रेनु्नेही 'आय लव्ह यू' असं कॅप्शन दिलंय.

श्रेनु आणि अक्षयव दीड महिन्यांनंतर लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्यावर इतर कलाकरांनी अभिनंदनाचा वर्षाव केलाय. अधविक महाजन, अलिशा पवार, मानसी श्रीवास्तवसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. तसंच नकुल मेहता, कृष्णा मुखर्जीने पोस्ट लाईक केली आहे. 

कशी झाली ओळख?

श्रेनु आणि अक्षय यांची भेट 2021 मध्ये झाली होती. अक्षय म्हात्रे हा देखील अभिनेता आहे.  'घर एक मंदिर' शोच्या वेळी त्यांची ओळख झाली. त्यानंतर ते अनेकदा एकमेकांना भेटले आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अक्षय म्हात्रे मराठी कुटुंबातील असून त्याने मराठी सिरीज, तसंच मराठी म्युझिक अल्बममध्येही काम केलं आहे.  दोघांची रोका सेरेमनीही आधीच पार पडली आहे. डिसेंबरच्या शेवटी दोघंही लग्नबंधनात अडकतील. श्रेनुचं होमटाऊन बडोदा येथेच हा विवाहसोहळा पार पडेल. 

Web Title: TV actress Shrenu Parekh is going to get married to marathi actor Akshay Mhatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.