प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला साखरपुडा, बॉयफ्रेंडने गुडघ्यावर बसून खास अंदाजात घातली अंगठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 08:58 IST2025-11-17T08:57:29+5:302025-11-17T08:58:36+5:30
मेघन जाधवचं लग्न झाल्यानंतर आता टीव्ही इंडस्ट्रीतील आणखी एक अभिनेत्रीने साखरपुडा केला आहे. तीच्या साखरपुड्याचे रोमँटिक फोटो व्हायरल झाले आहेत

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने केला साखरपुडा, बॉयफ्रेंडने गुडघ्यावर बसून खास अंदाजात घातली अंगठी
लोकप्रिय टीव्ही मालिका 'सपने सुहाने लड़कपन के'मध्ये 'गुंजन' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपल त्यागी (Roopal Tyagi) हिने नुकताच तिचा साखरपुडा केला आहे. तिने बॉयफ्रेंड नोमिश भारद्वाज याच्याशी एंगेजमेंट केली आहे. रूपलने सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याचे सुंदर फोटो शेअर केले आहे. विशेष म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडने गुडघ्यावर बसून तिच्याजवळ प्रेम व्यक्त केलंय.
रूपल त्यागीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर खास रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बॉयफ्रेंड नोमिश भारद्वाज गुडघ्यावर बसून रूपलला प्रपोज करताना दिसत आहे. नोमिशने रुपलच्या बोटात अंगठी घातली आणि तिला फुलांचा गुच्छ देऊन प्रपोज केलं. या खास क्षणाचे फोटो शेअर करताना रूपलने कॅप्शनमध्ये Forever Yes, असं लिहिलं आहे. या फोटोंमध्ये रूपल खूप आनंदी दिसत असून ती तिची एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करतानाही दिसत आहे.
साखरपुड्याच्या या खास प्रसंगी रूपल त्यागीने लाल रंगाचा हॉल्टर नेक ड्रेस परिधान केला होता. खास कानातले परिधान करुन रुपलने आकर्षक घड्याळही घातलं होतं. रूपल आणि नोमिश यांनी एकत्र अनेक रोमँटिक पोझ देत चाहत्यांची मने जिंकली आहेत.
रूपलने आपल्या करिअरची सुरुवात 'कसम से' या मालिकेत कॅमिओ भूमिकेतून केली होती. त्यानंतर तिने 'हमारी बेटियों का विवाह' आणि 'दिल मिल गये' यांसारख्या अनेक शोमध्ये काम केले. २०१२ मध्ये आलेल्या 'सपने सुहाने लड़कपन के' या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्यानंतर ती घराघरात पोहोचली. या शोमध्ये तिने 'गुंजन'चे पात्र अविस्मरणीय बनवले. ती 'झलक दिखला जा ४' आणि 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर २' या रिअॅलिटी शोचाही भाग होती. ती शेवटची 'रंजू की बेटियां' या मालिकेत दिसली होती. सध्या रूपलने टीव्ही इंडस्ट्रीपासून थोडीशी विश्रांती घेतली असून, आता तिच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.