घटस्फोटाच्या चर्चांमध्ये बिगडली तब्येत, दिव्यांका त्रिपाठीला १०२ डिग्री ताप अन् डेंग्यूची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:55 IST2025-04-15T12:52:18+5:302025-04-15T12:55:07+5:30
घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिव्यांका आजारी पडली आहे.

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये बिगडली तब्येत, दिव्यांका त्रिपाठीला १०२ डिग्री ताप अन् डेंग्यूची लागण
Divyanka Tripathi Diagnosis dengue : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) वेबसिरीज, आणि टेलिव्हिजन या दोन्ही माध्यमांत काम करत आहे. दिव्यांका सध्या तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिव्यांका पती विवेक दहियापासूनघटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिव्यांका आजारी पडली आहे.
दिव्यांकानं चाहत्यांना चिंतेत टाकणारी बातमी दिली आहे. दिव्यांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून थर्मामीटरचा फोटो शेअर करत डेंग्यूची लागण झाल्याचं सांगितलं. नुकतंच दिव्यांकाला एका पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. १०२ अंशांचा ताप असूनही दिव्यांका या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिली. त्यावेळी तिला डेंग्यू झाल्याचं कळालं नव्हतं. पण, ताप उतरत नसल्याचं पाहून तिनं चाचणी केल्यावर डेंग्यू झाल्याचे निदान झालं. या पोस्टनंतर चाहते ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
दिव्यांका तेव्हा आजारी पडली, जेव्हा विवेक दहियापासून घटस्फोटोच्या चर्चांनी जोर धरला आहे. विवेकचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तो एका दुसऱ्या मुलीसोबत दिसला होता. या व्हिडीओमुळेच दिव्यांका आणि विवेक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. याआधीही या दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या. आताही या फक्त अफवाच असल्याचं विवेकने म्हटलं आहे.
दिव्याकानं 'बनू में तेरी दुल्हन', 'ये है मोहब्बतें' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये आणि 'खतरों के खिलाडी'सारख्या साहसी रिॲलिटी शोमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी ती जिओच्या 'The Magic Of Shiri' या वेब सिरीजमध्ये जादूगाराच्या भूमिकेत दिसली होती. यात तिच्यासोबत जावेद जाफरी आणि नमित दास हेही महत्त्वाच्या भूमिकेत होते. दिव्यांका आणि विवेकने २०१६ मध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत.