"फिटनेस सोड अन् बाळाचं प्लॅनिंग कर" दिव्यांका त्रिपाठीच्या एकाच उत्तराने ट्रोलर्सची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 10:35 IST2023-12-06T10:34:10+5:302023-12-06T10:35:57+5:30

दिव्यांकाच्या कुटुंबापेक्षा जास्त ट्रोलर्सलाच तिच्या प्लॅनिंगची काळजी

Tv actress Divyanka Tripathi Dahiya gave befitting reply to trollers who was concerned about her baby planning | "फिटनेस सोड अन् बाळाचं प्लॅनिंग कर" दिव्यांका त्रिपाठीच्या एकाच उत्तराने ट्रोलर्सची बोलती बंद

"फिटनेस सोड अन् बाळाचं प्लॅनिंग कर" दिव्यांका त्रिपाठीच्या एकाच उत्तराने ट्रोलर्सची बोलती बंद

'ये है मोहोब्बते' या हिंदी मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) सोशल मीडियावर नेहमीच खुलेपणाने आपले मत मांडत असते. दिव्यांकाचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. ती तिचे दैनंदिन अपडेट्स, आगामी प्रोजेक्ट्सविषयी माहिती, फिटनेस टिप्स शेअर करत असते. मात्र नेटकरी सध्या तिला वेगळ्याच कारणावरुन ट्रोल करत आहेत. फिटनेस सोड आणि बाळाचं प्लॅनिंग कर असे सल्ले देत आहेत. यावर आता दिव्यांकाने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

दिव्यांकाने नुकताच सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओखाली काही ट्रोलर्सने फिटनेस सोड आणि बाळाचं प्लॅनिंग कर अशा कमेंट केल्या आहेत. या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत दिव्यांकाने लिहिले, 'दोन प्रकारचे ट्रोलर्स आहेत. एक ज्यामध्ये असे पुरुष आहेत जे लोकांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांना वाईट पद्धतीने ट्रोल करतात, त्यांची आलोचना करतात. तर दुसरं म्हणजे काही महिलांनामाझ्या बाळाच्या प्लॅनिंगची जास्त उत्सुकता आहे जितकी माझ्या कुटुंबालाही नाही.'

ती पुढे लिहिते, 'आणि मग एक तुम्ही आहात-जे चांगल्या गोष्टी शोधतात. तुम्ही माझं कौतुक करता, नम्र वागता. तुमच्याकडे निर्मळ मन आणि चांगले संस्कार आहेत हे पाहून बरं वाटलं.'

दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दहिया यांच्या लग्नाला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र अद्याप त्यांनी फॅमिली प्लॅनिंग केलं नसल्याने ट्रोलर्स सतत दिव्यांकावर निशाणा साधतात. दिव्यांकाने एकाच पोस्टमधून ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. दिव्यांकाची 'ये हौ मोहोब्बते' मालिका प्रचंड गाजली. यानंतर ती 'खतरो के खिलाडी' मध्येही दिसली.

Web Title: Tv actress Divyanka Tripathi Dahiya gave befitting reply to trollers who was concerned about her baby planning