Maha Kumbh 2025: महाकुंभमेळ्यात गेलेल्या सौरभने सांगितला विलक्षण अनुभव, म्हणतो- "मी सेलिब्रिटी आहे म्हणून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:07 IST2025-01-17T17:06:26+5:302025-01-17T17:07:20+5:30
मराठी अभिनेता सौरभ चौगुलेदेखील कुंभमेळ्यात गेला होता. याचा अनुभव त्याने शेअर केला आहे.

Maha Kumbh 2025: महाकुंभमेळ्यात गेलेल्या सौरभने सांगितला विलक्षण अनुभव, म्हणतो- "मी सेलिब्रिटी आहे म्हणून..."
प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्याची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. केवळ देशातूनच नव्हे तर जगभरातून या कुंभमेळ्यासाठी भाविक हजेरी लावत आहेत. कुंभमेळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मराठी अभिनेता सौरभ चौगुलेदेखील कुंभमेळ्यात गेला होता. याचा अनुभव त्याने शेअर केला आहे.
सौरभने काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्यातील काही फोटो शेअर केले होते. आता त्याने अनुभव सांगत व्हिडिओ शेअर केला आहे. "मला अनेक जण मेसेज करुन मी इथे कसा पोहोचलो? माझा अनुभव कसा होता? या गोष्टी विचारत आहेत. तर सगळ्यात आधी मला हे सांगायचं आहे की मी एक अभिनेता किंवा सेलिब्रिटी आहे म्हणून मला स्पेशल ट्रिटमेंट मिळते असं काही नाही. मी इथे बाकीच्यांसारखंच ट्रेनने आलोय. इतरांसारखंच गर्दी आणि रांगेतून जाऊन दर्शन घेतलंय. एक गोष्ट मला नक्की सांगाविशी वाटते की यांचं मॅनेजमेंट हे खूप चांगलं, स्ट्राँग आहे. इथे जागोजागी कचरा काढला जातो. लाखो पोलीस, आर्मी, BSF जवान इथे तैनात आहेत. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यांच्याकडे मदत मागू शकता", असं सौरभ व्हिडिओत म्हणत आहे.
पुढे तो म्हणतो, "क्राऊड मॅनेजमेंट खूपच भारी आहे. तुम्ही ज्या गेटने आत जाता त्या गेटने बाहेर येता येत नाही. सगळं फिरुनच तुम्हाला बाहेर यावं लागतं. या संपूर्ण कुंभमेळ्यात राजकीय पक्षाचा एकही फलक मला दिसला नाही. इथे फक्त आणि फक्त धर्मच पाहिला जातो. आणि या धर्मासाठी आस्था आणि श्रद्धा असलेली लोकं इथे येतात. हा अनुभव आपल्याला मिळतोय यासाठी आपण भाग्यवान आहोत, असं मला वाटतं. तुम्हीही नक्की कुंभमेळ्याला या...हर हर गंगे हर हर महादेव".