Amruta Pawar Mehndi Ceremony : ‘तुझ्या माझ्या संसाराला...’ फेम अमृता पवारच्या घरी लगीनघाई, मेहंदी लुक आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 15:56 IST2022-07-04T15:46:37+5:302022-07-04T15:56:15+5:30
Amruta Pawar Mehndi Ceremony : नुकतीच अमृता पवारची बॅचलर पार्टी झाली. आता लग्नविधींना सुरूवात झाली आहे. अमृताच्या मेहंदी सोहळ्याची झलक समोर आली आहे.

Amruta Pawar Mehndi Ceremony : ‘तुझ्या माझ्या संसाराला...’ फेम अमृता पवारच्या घरी लगीनघाई, मेहंदी लुक आला समोर
मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीनंतर प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने प्रियकर प्रतीक शाहसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (Tujhya Majhya Sansarala Ani Kaay Hawa ) मालिकेत अदितीची भूमिका साकारणारी अमृता पवार. होय, नुकतीच अमृता पवारची (Amruta Pawar) बॅचलर पार्टी झाली. आता लग्नविधींना सुरूवात झाली आहे. अमृताच्या मेहंदी सोहळ्याची झलक समोर आली आहे.
इन्स्टास्टोरीवर अमृताने मेहंदीची झलक शेअर केली आहे. यात अमृता निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते आहेत. फुलांचे दागिणे, न्यूड मेकअप असा तिचा लुक आहे.
अमृताने नील पाटीलला जोडीदार म्हणून निवडलं आहे. गेल्या 4 एप्रिल रोजी अमृता व नीलचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला होता. तिच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत आई बाबा आणि आईची लाडकी लेक अशा त्रिकोणी कुटुंबातून ५० जणांच्या कुटुंबात लग्न होऊन आलेल्या अदितीची भूमिका अमृता साकारते आहे. सध्या एकत्र कुटुंब पद्धती हरवत चालली असताना ती टिकवून कशी ठेवता येईल हा संदेश घेऊन आलेली ही मालिका आदिती आणि सिद्धार्थ यांच्या वेगवेगळ्या कौटुंबिक विश्वावर आधारित आहे. या मालिकेत अमृताने आदितीची भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेव्यतिरिक्त अमृताने ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.
अमृता अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सीए अंतर्गत लेखापाल म्हणून काम करत होती. यानंतर तिनं अभिनेत्री म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात ‘दुहेरी’ या मराठी मालिकेतून केली.