‘ती परत आलीये’ सेटवर फुलली तन्वी-नचिकेतची प्रेमकहाणी, गुपचूप उरकला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 17:26 IST2022-06-12T17:17:13+5:302022-06-12T17:26:24+5:30
Ti Parat Aaliye : झी मराठी वाहिनीवरील ‘ती परत आलीये’ ही मालिका आली आणि अल्पावधीत गाजली. याच मालिकेच्या सेटवर एका जोडप्याचं प्रेम बहरलं आणि नुकतंच हे जोडपं एन्गेज्ड झालं.

‘ती परत आलीये’ सेटवर फुलली तन्वी-नचिकेतची प्रेमकहाणी, गुपचूप उरकला साखरपुडा
झी मराठी वाहिनीवरील ‘ती परत आलीये’ (Ti Parat Aaliye) ही मालिका आली आणि अल्पावधीत गाजली. या मालिकेने अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. मालिका संपली, पण मालिकेतील प्रत्येक पात्र लोकप्रिय झालं. बाबुराव, सायली, सतेज, अनुराग, विक्रांत, रोहिणी, अभय, हनम्या ही पात्र चांगलीच गाजली. याच मालिकेच्या सेटवर एका जोडप्याचं प्रेम बहरलं आणि नुकतंच हे जोडपं एन्गेज्ड झालं.
होय, आम्ही बोलतोय ते ‘ती परत आलीये’ या मालिकेत रोहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री तन्वी कुलकर्णी ( Tanvi Kulkarni) आणि विक्रांतची भूमिका साकारणारा अभिनेता नचिकेत देवस्थळी ( Nachiket Devasthali) यांच्याबद्दल. मालिकेच्या सेटवर तन्वी व नचिकेत यांच्यात मैत्री झाली. काहीच दिवसांत दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आता त्यांचा साखरपुडा पार पडला आहे.
तन्वी आणि नचिकेत यांनी साखरपुड्याचे काही फोटो इन्स्टावर शेअर केले आहे. ‘हमसफर’ असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
‘ती परत आलीये’ मालिकेत रोहिणी प्रेग्नंन्ट असल्याचे दाखवले होते. ही भूमिका तन्वीने साकारली होती. तन्वीने रंगभूमीपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेत तन्वीने सगुणाबाईची भूमिका साकारली होती. जुळता जुळता जुळतंय की, स्वराज्य जननी जिजामाता अशा मालिकांमधून तन्वी झळकली आहे.
नचिकेत देवस्थळी हा देखील नाट्य, मालिका अभिनेता आहे. ‘महानिर्वाण’ या नाटकातून नचिकेतने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. ‘ती परत आलीये’ ही नचिकेतची पहिलीच टीव्ही मालिका होती.