'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतला हा अभिनेता लवकरच बांधणार लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 03:40 PM2022-12-12T15:40:07+5:302022-12-12T15:41:09+5:30

नुकतेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर तसेच आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले हे कपल विवाह बंधनात अडकले आहेत. त्यानंतर आता आणखी एक अभिनेता लग्नगाठ बांधणार आहे.

This actor of 'Thipkayanchi Rangoli' serial will soon tie the knot | 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतला हा अभिनेता लवकरच बांधणार लग्नगाठ

'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतला हा अभिनेता लवकरच बांधणार लग्नगाठ

googlenewsNext

मराठी सिनेइंडस्ट्रीत सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. नुकतेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर तसेच आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले हे कपल विवाह बंधनात अडकले आहेत. त्यानंतर आता आणखी एक अभिनेता लग्नगाठ बांधणार आहे. हा अभिनेता म्हणजे ठिपक्यांची रांगोळी मालिकेत शशांकची भूमिका साकारणारा चेतन वडनेरे. तो लवकरच लग्न करणार असल्याचे समजते आहे. तेदेखील खुद्द अभिनेत्याचे सोशल मीडियावर हिंट दिली आहे.

अभिनेता चेतन वडनेरेने त्याचे नाते कधीच लपवून ठेवले नव्हते. अभिनेत्री ऋजुता धारप आणि चेतन बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा ते एकमेकांसोबत टाईम स्पेंड करताना दिसतात. चेतनने इंस्टाग्रामवर स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत समुद्रकिनारी त्याने आणि ऋतुजाने हातात भेळ पकडलेली दिसत आहे आणि त्यावर अँड काउंटडाउन बिगेन असे लिहिले आहे. ज्यामुळे ते दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचं समजतंय.

चेतन वडनेरे 'फुलपाखरू' या मालिकेत झळकला होता. याचं मालिकेत ऋजुता देखील सहकलाकाराच्या भूमिकेत होती. 'फुलपाखरू'च्या सेटवर चेतन आणि ऋजुता यांची भेट झाली होती.

 चेतन मूळचा नाशिकचा असल्याने त्याने तिथेच शालेय तसेच पदवीचं शिक्षण घेतलं होतं. अभिनयाच्या ओढीने त्याची पावलं मुंबईकडे वळली. नाटक, एकांकिका गाजवत असताना स्टार प्रवाहवरील 'लेक माझी लाडकी' या मालिकेत अभिनयाची संधी मिळाली.

Web Title: This actor of 'Thipkayanchi Rangoli' serial will soon tie the knot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.