'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या अभिनेत्याने प्राजक्ता माळीला केलं थेट 'प्रपोज'; काय म्हणाली अभिनेत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 11:47 IST2025-11-04T11:47:07+5:302025-11-04T11:47:51+5:30
Maharashtrachi Hasyajatra Show : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहचलेल्या अभिनेत्यानं प्राजक्ता माळीला प्रपोज केलेलं का? याबद्दल विचारले असता अभिनेत्यानं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या अभिनेत्याने प्राजक्ता माळीला केलं थेट 'प्रपोज'; काय म्हणाली अभिनेत्री?
केवळ भारताच्याच नव्हे, तर जगभरातील लाखों प्रेक्षकांचे प्रेम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाला लाभले आहे. या कॉमेडी शोच्या माध्यमातून अनेक नवीन कलाकारांना यशाची शिखरे गाठता आली. या हास्यजत्रेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. या शोमधील कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. यातील एक विनोदवीर ओंकार राऊतच्या अफेयरच्या चर्चा अनेकदा ऐकायला मिळतात. त्यातीलच एक चर्चा म्हणजे, ओंकारने प्राजक्ता माळीला प्रपोज केले होते. नुकत्याच एका मुलाखतीत ओंकारने या चर्चेवर मौन सोडले आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार राऊत सध्या लग्नाच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे. 'कविरत स्टुडिओ'ला दिलेल्या मुलाखतीत त्याला लग्नाबद्दल विचारले असता ओंकारने, "माहित नाही... कोणाकडे असेल मुलगी तर सांगा. अनुरूपवर पण मी रजिस्टर करणार आहे," अशी थेट इच्छा व्यक्त केली. त्याच्या वडिलांनीच त्याला अनुरूपवर नोंदणी करण्याचा सल्ला दिल्याचे त्याने यावेळी सांगितले.
ओंकार प्राजक्ताबद्दल म्हणाला....
यानंतर ओंकारला होस्ट प्राजक्ता माळीला प्रपोज केल्याबद्दल विचारले असता, या चर्चेवर तो म्हणाला, "हो, केलंय मी प्रपोज... पण ते खूप नॅचरल होतं." 'ओंकारची गर्लफ्रेंड असते शिवाली' या स्कीटमुळे हे सुरू झाले. "त्यात मी सतत तिला काही ना काही टोकत असतो. ते लिखित असते. पण तिच्याकडून जे रिअॅक्ट होतं, त्यामुळेच तो विनोद जास्त वर्कआऊट झाला," असे ओंकारने स्पष्ट केले. तसेच, प्राजक्ता माळीचे भरभरून कौतुक करत तो म्हणाला, "ती माझी चांगली मैत्रीण आहे. प्राजक्ता खूप काळजी घेणारी मुलगी आहे. मनाने ती खूप चांगली आहे आणि मित्रांची चौकशी करायला ती स्वतःहून पुढे येते."