'कुक्की गँगचे आदरणीय मेंबर्स..'; 'ठिपक्यांची रांगोळी'फेम कलाकारांची ऑफस्क्रीन धम्माल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 17:46 IST2022-07-13T17:45:39+5:302022-07-13T17:46:29+5:30
Thipkyanchi rangoli: 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत कुक्कीची भूमिका साकारणाऱ्या अतुल तोडणकर यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

'कुक्की गँगचे आदरणीय मेंबर्स..'; 'ठिपक्यांची रांगोळी'फेम कलाकारांची ऑफस्क्रीन धम्माल
छोट्या पडद्यावर अलिकडेच सुरु झालेली मालिका म्हणजे 'ठिपक्यांची रांगोळी' (thipkyanchi rangoli). या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे या मालिकेविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक असतात. विशेष म्हणजे पडद्यावर एकमेकांसोबत उत्तम बॉण्डिंग शेअर करणारे हे कलाकार पडद्यामागेही तसेच वावरतात. त्यांची एकमेकांसोबत चांगली गट्टी जमली असून बऱ्याचदा ते सोशल मीडियावर काही भन्नाट पोस्ट शेअर करत असतात. सध्या या कलाकारांचा असाच एक फोटो व्हायरल होत आहे.
'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत कुक्कीची भूमिका साकारणाऱ्या अतुल तोडणकर यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मालिकेमधील काही कलाकार दिसत असून या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ऑफस्क्रीन त्यांची कशी मस्ती चालते हे सांगितलं आहे.
अतुल तोडणकर यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये मालिकेतील शशांक, माई, कुकी आणि इतर कलाकार दिसत आहे. यात कुकी आणि मालिकेचे दिग्दर्शक झोपल्याचं पाहायला मिळत आहे. “शूटिंगमध्ये दुपारच्या जेवणानंतर वज्रसनात बसले पाहिजे. आमचे योगगुरू श्री.अमेय कानिटकर यांच्या सूचनेनुसार सगळे अर्थात प्राची, माई, शशांक आणि स्वतः अमेय हे वज्रसनात बसले आहेत. आणि दिग्दर्शकीय सूचनेनुसार कुक्की आणि दिग्दर्शक जेवणानंतर शवासनात बसले आहेत. योगा से ही होगा. कुक्की गँगचे आदरणीय मेंबर्स : अप्पू, सुमी आणि मानसी जेवणानंतर गायब”, असं भन्नाट कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे.
दरम्यान ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. यात शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे या कलाकारांचा समावेश आहे.