आई-बाबांच्या कडेवरच्या ‘या’ चिमुकलीला ओळखलंत? आज आहे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 14:02 IST2022-06-12T13:58:55+5:302022-06-12T14:02:00+5:30
Throwback : टीव्हीवरच्या एका क्यूट मराठी अभिनेत्रीच्या बालपणीचा हा फोटो आहे. हा सुंदर फोटो पाहून आई बाबांच्या कुशीत लपलेली ही चिमुकली आहे तरी कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच.

आई-बाबांच्या कडेवरच्या ‘या’ चिमुकलीला ओळखलंत? आज आहे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री
सेलिब्रिटींच्या बालपणीचे फोटो क्षणात व्हायरल होतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो पाहणं कुणाला आवडत नाही. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. टीव्हीवरच्या एका क्यूट मराठी अभिनेत्रीच्या बालपणीचा हा फोटो आहे. हा सुंदर फोटो पाहून आई बाबांच्या कुशीत लपलेली ही चिमुकली आहे तरी कोण? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच.
तुम्ही अद्यापही तिला ओळखू शकला नसाल तर ती आहे तुमची लाडकी अप्पू. होय, ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) या मालिकेतील अपूर्वा. म्हणजे अपूर्वाची भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar).
कालच ज्ञानदाच्या आईचा वाढदिवस झाला. या वाढदिवसानिमित्तत तिनं आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यातलाच हा एक फोटो व्हायरल होतोय.
ज्ञानदाने आत्तापर्यंत अनेक मराठी मालिका व चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तिचा जन्म 26 जून 1995 रोजी पुण्यात झाला आहे. थिएटर आर्टिस्ट म्हणून तिने काम करण्यास सुरूवात केली. 2016 मध्ये ती टीव्ही इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमवण्यासाठी ती मुंबईत आली आणि तेथूनच खऱ्या अर्थाने तिच्या अभिनय प्रवासाला सुरूवात झाली.
‘सख्या रे’ ही तिची पहिली मालिका. या मालिकेत तिने वैदेहीची भूमिका साकारली होती. यानंतर जिंदगी नॉट आऊट, शतदा प्रेम करावे, इअर डाऊन अशा अनेक मालिकेत तिने भूमिका साकारल्या. मराठीशिवाय स्टार प्लस या हिंदी वाहिनीवरील ‘शादी मुबारक’ या मालिकेतही तिने काम केलं. 2020मध्ये ‘धुरळा’ या मराठी चित्रपटात तिला संधी मिळाली. यात तिने दिव्या बाबरची भूमिका साकारली होती. सध्या सध्या ती ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत अपूर्वाच्या भूमिकेत दिसत आहे.