"भातुकलीचा खेळ रंगतोय..", 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता आणि कुणालच्या प्री वेडिंगचा टीझर आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 19:30 IST2025-02-07T19:29:41+5:302025-02-07T19:30:14+5:30
'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर तिच्या प्री वेडिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे.

"भातुकलीचा खेळ रंगतोय..", 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता आणि कुणालच्या प्री वेडिंगचा टीझर आला समोर
'बिग बॉस मराठी ५' (Bigg Boss Marathi Season 5 ) मधून घराघरात लोकप्रिय झालेली 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. सध्या तिची लगीनघाई सुरु आहे. लवकरच ती मराठी कलाविश्वातील संगीतकार कुणाल भगतसोबत लग्न करणार आहे. ती लग्न कधी करणार हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान आज अंकिता आणि कुणालने त्यांच्या प्री वेडिंगचा टीझर शेअर केला आहे.
'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर तिच्या प्री वेडिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत निसर्गरम्य कोकण आणि नारळाच्या बागा, निळाशार समुद्र पाहायला मिळतो आहे. त्यानंतर अंकिता आणि कुणाल रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. त्यानंतर अंकिता डोळ्याला पट्टी बांधून कुणालला पकडताना दिसत आहे. त्यानंतर ते समुद्र किनारी चालताना दिसत आहे. बोटीने फिरताना दिसत आहेत. त्यांचे हे प्री वेडिंग मालवणमध्ये शूट करण्यात आले आहे.
अंकिता वालावलकरने प्री वेडिंगचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, भातुकलीचा खेळ रंगतोय…..पण काय असेल मनात?
एक आगळं वेगळं प्री वेडिंग लवकरच येणार भेटीला!!!!!! कधी पोस्ट करू तुम्हीच सांगा… अंकिताच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ते तिला लवकर हा व्हिडीओ शेअर कर, असे सांगत आहेत. अंकिताने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, अंकिता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात लग्नबेडीत अडकणार असल्याचे बोलले जात आहे. प्री वेडिंगमधून तरी अंकिता कुणालच्या लग्नाची तारीख समोर येईल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.