ना मुंबई, ना ठाणे! 'ठरलं तर मग' मधील सायलीने 'या' ठिकाणी घेतलं ड्रीम होम, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 08:53 IST2026-01-02T08:50:31+5:302026-01-02T08:53:55+5:30
कर्जतची जुई झाली पुणेकर! नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला घेतलं हक्काचं घर, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

ना मुंबई, ना ठाणे! 'ठरलं तर मग' मधील सायलीने 'या' ठिकाणी घेतलं ड्रीम होम, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Jui Gadkari New House: 'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असणारी मालिका आहे. गेल्या ३ वर्षांपासून ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करते आहे. या मालिकेचं कथानक तसेच कलाकारांचा अभिनय यामुळेच ही मालिका प्रेक्षकांची आवडती बनली आहे.ठरलं तर मग मध्ये टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा असलेली नायिका जुई गडकरीची मुख्य भूमिका आहे. दरम्यान, चाहत्यांमध्ये कायम आपल्या मालिकेमुळे चर्चेत असणारी जुई आता एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला तिने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरात आपलं हक्काचं घर असाव अशी प्रत्येकाची इच्छा असते. नुकतंच जुईचं हे स्वप्न पूर्णत्वास आलं आहे. मुळची कर्जतची असणारी जुई आता पुणेकर झाली आहे. रामा ग्रुप्सच्या माध्यमातून तिने पुणेकर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तिने या हक्काच्या घरात पाऊल ठेवलं आहे.

घर खरेदी केल्यावर जुईने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.जुईने नवीन घराच्या चाव्या असलेला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावर तिनं नवीन सुरुवात, घर, पुणे...असे हॅशटॅग सुद्धा वापरले आहेत. सध्या अभिनेत्रीवर कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वर्कफ्रंट
जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'पुढचं पाऊल', 'सरस्वती' तसेच 'वर्तूळ' अशा मालिकांमध्ये जुई मुख्य भूमिकेत झळकली. 'पुढचं पाऊल' मालिकेतून सोशिक सून बनून घराघरात पोहोचलेली जुई सध्या 'ठरलं तर मग' मालिकेत स्मार्ट, हुशार आणि प्रेमळ सूनेची भूमिका साकारत आहे. जुईला चाहत्यांकडूनही प्रचंड प्रेम मिळतं.
