'ठरलं तर मग'ची खलनायिका प्रियाची खास पोस्ट, बाळाचा फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:34 IST2025-08-21T16:33:01+5:302025-08-21T16:34:56+5:30
प्रियांकाने एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

'ठरलं तर मग'ची खलनायिका प्रियाची खास पोस्ट, बाळाचा फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना
Priyanka Tendolkar: 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका घराघरात मोठ्या आवडीने पाहिली जाते. टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानी ही मालिका असून यातील कलाकारसुद्धा चर्चेत असतात. 'ठरलं तर मग'मध्ये सायली-अर्जुनला त्रास देणारी खलनायिका प्रिया अर्थात प्रियांका तेंडोलकरचा अभिनयदेखील प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. तिचाही मोठा चाहतावर्ग आहे. अशातच प्रियांकाने एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
प्रियांका ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. प्रियांकानं इंस्टाग्रामवर बाळासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले, "मावशी होण्यासारखं सुख नाही!". पुढे आपल्या बहिणीला टॅग करत प्रियांका म्हणाली, "धन्यवाद… तू मला आजपर्यंत दिलेली ही सर्वात चांगली भेट आहे".
प्रियांकाने तिच्या भाचीचे नावही सांगितले आहे. तिनं लिहलं, "आमची 'अनाईका'. पुढे 'अनाईका'ला आशीर्वाद देत म्हटलं, "देव तुला आशीर्वाद देवो बाळ. जेव्हा तुझा दिवस, आठवडा, महिना किंवा वर्षही नसेल तेव्हा तिथे मी तुझ्यासाठी असेन". तिच्या या भावनिक पोस्टवर अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट केल्यात. दरम्यान, प्रियंकाच्या कामाविषयी बोलायचे झाल्यास ती याआधी 'साथ दे तू मला', 'पाहिले न मी तुला' या मालिकांमध्ये दिसली होती. 'ठरलं तर मग'मधील तिचं प्रिया हे पात्र विशेष लोकप्रिय ठरतंय.