VIDEO: 'झुमका गिरा रे...; सुपरहिट गाण्यावर 'बिग बॉस' फेम योगिता चव्हाणने धरला ठेका, नेटकऱ्यांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 11:54 IST2025-01-13T11:50:53+5:302025-01-13T11:54:58+5:30

योगिता चव्हाण (Yogita Chavan) ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. '

television actress bigg boss marathi 5 fame yogita chavan dance on jhumka gira re song video viral on social media | VIDEO: 'झुमका गिरा रे...; सुपरहिट गाण्यावर 'बिग बॉस' फेम योगिता चव्हाणने धरला ठेका, नेटकऱ्यांकडून कौतुक

VIDEO: 'झुमका गिरा रे...; सुपरहिट गाण्यावर 'बिग बॉस' फेम योगिता चव्हाणने धरला ठेका, नेटकऱ्यांकडून कौतुक

Yogita Chavan Video :  योगिता चव्हाण (Yogita Chavan) ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'जीव माझा गुंतला' या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने साकारलेली अंतरा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सहभागी होऊन योगिता चर्चेत आली होती. त्यानंतर योगिताची लोकप्रियता सुद्धा कमालीची वाढली. सोशल मीडियावरही योगिता नेहमीच सक्रिय असल्याची पाहायला मिळते. त्याद्वारे ती चाहत्यासोबत तिच्या प्रोजेक्ट्सबद्दल किंवा वैयक्तिक आयुष्याबाबत माहिती शेअर करत असते. नुकताच योगिताने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. 


नुकताच योगिता चव्हाणने इन्स्टाग्रामवर तिचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. १९६६ साली प्रदर्शित झालेल्या 'मेरा साया' चित्रपटातील 'झुमका गिरा रे' या गाण्यावर तिने जबरदस्त डान्स केला आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीचं नृत्य कौशल्य आणि एक्सप्रेशन्सने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. योगिता या व्हिडीओमध्ये आकाशी रंगाचा स्लिव्हलेस ड्रेस, मोकळे केस अन् कानात झुमके अशा लूकमध्ये पाहायला मिळतेय. त्यासोबतच अभिनेत्रीचं नृत्य कौशल्य पाहून नेटकऱ्यांनी तिचं प्रचंड कौतुक केलं आहे. 

योगिताने शेअर केलेल्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांसह मराठी कलाकारांनी लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या व्हिडीओर योगिताचा पती सौरभ चौघुलेने केलेली कमेंट लक्षवेधी ठरते आहे. 

Web Title: television actress bigg boss marathi 5 fame yogita chavan dance on jhumka gira re song video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.