आजीला नातवाचं कौतुक! शिव ठाकरेच्या वाढदिवशी आजीने केलं असं काही...; कुटुंबीयाचं प्रेम पाहून अभिनेता भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 17:45 IST2025-09-09T17:28:36+5:302025-09-09T17:45:52+5:30

लाडक्या नातवाच्या वाढदिवशी आजीने काढली दृष्ट, शिव ठाकरेने शेअर केलेल्या व्हिडीओवर होतोय प्रेमाचा वर्षाव

television actor shiv thackrey share special video on the occasion of his birthday he was gets emotional after seeing family love | आजीला नातवाचं कौतुक! शिव ठाकरेच्या वाढदिवशी आजीने केलं असं काही...; कुटुंबीयाचं प्रेम पाहून अभिनेता भावुक

आजीला नातवाचं कौतुक! शिव ठाकरेच्या वाढदिवशी आजीने केलं असं काही...; कुटुंबीयाचं प्रेम पाहून अभिनेता भावुक

Shiv Thakre: रिअलिटी शोचा किंग अशी ओळख निर्माण केलेल्या शिव ठाकरेचा चाहतावर्ग हा फार मोठा आहे. मराठी बिग बॉस जिंकल्यानंतर शिव ठाकरे हिंदी बिग बॉसचा सीझन १६ही गाजवला. या शोचा तो उपविजेता ठरला. आपल्या साधेपणामुळे कायम चाहत्यांचं लक्ष वेधणारा शिव ठाकरे टिव्हीवरील लोकप्रिय चेहरा बनला आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. याच निमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

नुकताच शिव ठाकरेने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर बर्थडे सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्याची बहीण आणि आई त्याचं औक्षण करताना दिसत आहे. याशिवाय शिवची आजी लाडक्या नातवाला कोणाची नजर लागू नये म्हणून दृष्ट काढत आहे. सध्या सगळीकडे त्याच्या या व्हिडीओची चर्चा सुरु आहे. या व्हिडीओतील ठाकरे कुटुंबीयांचा साधेपणा पाहून नेटकऱ्यांची त्यांचं कौतुक केलं आहे. शिवाय घरच्यांचं प्रेम बघून शिव काहीसा भावुक झाल्याचा पाहायला मिळतो आहे.

'बिग बॉस मराठी २' मधून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता शिव ठाकरे याने आपल्या वागण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याने 'रोडीज', खतरों के खिलाडी' यासारख्या रिऍलिटी शोमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे.

Web Title: television actor shiv thackrey share special video on the occasion of his birthday he was gets emotional after seeing family love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.