"मला तर कोर्ट मॅरेजही चालेल", करण कुंद्रासोबत लग्नाच्या प्लॅनिंगवर तेजस्वी प्रकाश म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 12:14 IST2025-03-17T12:14:03+5:302025-03-17T12:14:33+5:30

तेजस्वी आणि करण लग्न कधी करणार असा प्रश्न सतत त्यांनी विचारला जातो. आता नुकतंच तिने लग्नावर भाष्य केलं आहे.

tejasswi prakash reveals marriage plans with boyfriend karan kundra says she is ok to do court marriage | "मला तर कोर्ट मॅरेजही चालेल", करण कुंद्रासोबत लग्नाच्या प्लॅनिंगवर तेजस्वी प्रकाश म्हणाली...

"मला तर कोर्ट मॅरेजही चालेल", करण कुंद्रासोबत लग्नाच्या प्लॅनिंगवर तेजस्वी प्रकाश म्हणाली...

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundra) टीव्हीवरील मोस्ट रोमँटिक आणि चर्चेतील कपल आहे. तेजस्वी आणि करण यांची बिग बॉसमध्ये ओळख झाली. त्यानंतर आजपर्यंत दोघं एकमेकांना डेट करत आहेत. कधी त्यांच्या परदेशवारीचे रोमँटिक फोटो व्हायरल होतात तर कधी दोघंही पार्टी, इव्हेंट्सला हातात हात घालून येतात. या जोडीचा मोठा चाहतावर्ग आहे. तेजस्वी आणि करण लग्न कधी करणार असा प्रश्न सतत त्यांनी विचारला जातो. आता नुकतंच तेजस्वीने लग्नावर भाष्य केलं आहे.

सेलिब्रिटी मास्टरशेफ शोमध्ये हिना खानने तेजस्वीला तिचा वेडिंग प्लॅन विचारला. यावेळी तेजस्वी म्हणाली, "करण पंजाबी आहे आणि मी महाराष्ट्रीयन. मला काही फार धामधुमीत लग्न करायचं नाही. नॉर्मल कोर्ट मॅरेज करायलाही मी तयार आहे. नंतर आम्ही मस्त फिरु, मस्ती करु."

करणसोबतच्या अफेअरबद्दल ती म्हणाली, "बिग बॉसमध्ये असताना दिवाळी सीक्वेन्स सुरु होता. आम्ही नाचत होतो. एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तेव्हाच आम्हाला एकमेकांबद्दल काहीतरी जाणवलं होतं. इतर सर्वजण व्यस्त होते आणि आम्ही दोघं ५ मिनिटांसाठी एकमेकांच्या डोळ्यात हरवलो होतो."

तेजस्वी आणि करण बिग बॉस सीझन १५ मध्ये एकत्र होते. तिथेच दोघं प्रेमात पडले. तेव्हापासून ते सोबत आहेत. त्यांची क्युट लव्हस्टोरी चाहत्यांचीही आवडती आहे. तेजस्वी आणि करणच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे.

करण कुंद्रा तेजस्वीहून ८ वर्षांनी मोठा आहे. करण ३७ वर्षांचा असून तेजस्वी २९ वर्षांची आहे. करण कुंद्रा याआधी अभिनेत्री कृतिका कामरासोबत रिलेशनशिपमध्ये होता. बरीच वर्ष त्यांचं प्रेमप्रकरण होतं. 'कितनी मोहब्बत है' या मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. याच मालिकेच्या सेटवर त्यांच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली होती. २०१२ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. 

Web Title: tejasswi prakash reveals marriage plans with boyfriend karan kundra says she is ok to do court marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.