'प्रेमाची गोष्ट'! तेजश्री प्रधान-अपूर्वा नेमळेकरने एकमेकींना केलं अनफॉलो, नक्की झालंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 12:20 IST2025-01-18T12:19:56+5:302025-01-18T12:20:40+5:30

दोघी एकत्र दुबई ट्रीपवरही गेल्या होत्या.

tejashri pradhan and apurva nemlekar unfollowed each other on instagram premachi goshta serial actors | 'प्रेमाची गोष्ट'! तेजश्री प्रधान-अपूर्वा नेमळेकरने एकमेकींना केलं अनफॉलो, नक्की झालंय काय?

'प्रेमाची गोष्ट'! तेजश्री प्रधान-अपूर्वा नेमळेकरने एकमेकींना केलं अनफॉलो, नक्की झालंय काय?

तेजश्री प्रधानने (Tejashri Pradhan) 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून एक्झिट घेतली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. तेजश्री मालिकेत मुक्ताचं पात्र साकारत होती. तिला प्रेक्षकांचं खूप प्रेमही मिळालं. मालिकाही टीआरपीत पुढे होती. मग तेजश्रीसराख्या अभिनेत्रीने अचानक मालिका सोडल्याने सगळेच संभ्रमात आहेत. याचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. आता एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar)  आणि तेजश्री प्रधानने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे.

अपूर्वा नेमळेकर 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत खलनायिकेचं पात्र साकारत आहे. तेजश्री आणि अपूर्वाची चांगली मैत्री झाली होती. त्यांच्या सोशल मीडियावरुन हे नेहमीच दिसायचं. त्यांचे दुबई ट्रीपचे फोटो तर खूप व्हायरल झाले होते. तेजश्री मालिकेतून बाहेर पडल्यानंतर  अपूर्वा मौन धरुनच होती. तिच्या जागी स्वरदा ठिगळे आली तेव्हा अपूर्वाने स्वरदासाठी खास पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं. पण मैत्रीण तेजश्रीसाठी काहीच लिहिलं नाही. तर आता तेजश्री आणि अपूर्वा दोघी इन्स्टाग्रामवरही एकमेकींना फॉलो करत नसल्याचं समोर आलं आहे. तेजश्रीच्या मालिका सोडण्याचं कारण अपूर्वा तर नाही असाही आता संशय उद्भवत आहे. अद्याप मालिकेशी संबंधीत कोणीही यावर अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही.


'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आता नवी मुक्ता आली आहे. तिचं नाव स्वरदा ठिगळे. स्वरदा आणि अपूर्वाने याआधी एका मालिकेत काम केलं होतं. आता पुन्हा त्या स्क्रीन शेअर करणार असल्याने अपूर्वाने तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती. पण अपूर्वा आणि तेजश्री दोघींमध्ये नक्की काय घडलं हे अनुत्तरितच आहे.

Web Title: tejashri pradhan and apurva nemlekar unfollowed each other on instagram premachi goshta serial actors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.