​बडे दूर से आये है या मालिकेच्या टीमने केले रियुनियन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 11:22 IST2017-12-06T05:52:39+5:302017-12-06T11:22:39+5:30

बडे दूर से आये है ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण ...

The team that has come from far away has done the reunion | ​बडे दूर से आये है या मालिकेच्या टीमने केले रियुनियन

​बडे दूर से आये है या मालिकेच्या टीमने केले रियुनियन

े दूर से आये है ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण आजही ही मालिका, या मालिकेचे कथानक प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडत होत्या. या मालिकेला प्रेक्षक प्रचंड मिस करत आहेत. या मालिकेत सुमीत राघवन, रुपाली भोसले, विनय रोहरा, अमित डोलावत, पुनिता तलरेजा, सुजय बागवे, अनुराधा वर्मा, भावना खत्री, विद्या तिवारी, रुनव शहा, दीपक पारीख आणि प्रेम मेहता यांच्या मुख्य भूमिका होत्या. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. ही मालिका जवळजवळ दीड-दोन वर्षं सुरू होती. त्यामुळे या मालिकेची टीम ही एखाद्या कुटुंबियांप्रमाणे झाली होती. मालिका बंद झाल्यानंतर त्यांना एकमेकांना भेटायला तितकासा वेळ मिळत नाही. पण तरीही या मालिकेतील कलाकार वेळात वेळ काढून एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न करत असतात. या मालिकेतील सगळ्या कलाकारांनी मिळून नुकतेच एक छोटेसे गेटटुगेदर केले होते. 
बडे दूर से आये है या मालिकेत मुरलीधरची भूमिका दीपक पारीखने साकारली होती. दीपकने नुकतेच नवीन घर घेतले असून त्याच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाला बडे दूर से आये है या मालिकेतील सगळ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. या वेळी एकप्रकारे या सगळ्या कलाकारांचे गेटटुगेदर झाले. त्यामुळे या मालिकेची संपूर्ण टीम खूपच खूश होती. त्या सगळ्यांनी मिळून खूप मजा मस्ती केली. यावेळी या मालिकेचे निर्माते आतिश कपाडिया देखील उपस्थित होते. याविषयी बडे दूर से आये है या मालिकेत हेमंत घोटालाची भूमिका साकारणारा पुनिता तलरेजा सांगतो, आम्ही आजही सगळे संपर्कात असल्याचा मला प्रचंड आनंद होत आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून चित्रीकरणाच्या वेळेच्या आमच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच खूप साऱ्या गप्पा मारल्या. आमची मैत्री अशीच राहो आणि आम्ही नेहमीच अशाप्रकारचे गेटटुगेदर करत राहो असे मला वाटते. 

Web Title: The team that has come from far away has done the reunion